भारतीय रेल्वेनं प्रवासी ट्रेनची 30 जूनपर्यंत सर्व तिकीटं केले रद्द, पैसे रिफंड करणार

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने आज एक मोठी घोषणा केली असून यापूर्वी बुकिंग केलेली ३० जूनपर्यंतची सर्व तिकीटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रवाशांना रेल्वे रिफंड देणार आहे. त्यात सर्व मेल, एक्सप्रेस, आणि उपनगरीय सेवांचा समावेश आहे.

या घोषणेचा अर्थ म्हणजे रेल्वे आपली नियमित सेवा ३०जूनपर्यंत सुरु करणार नाही. सर्व प्रवाशांना त्यांची रक्कम परत करणार आहे. सध्या मागणीनुसार श्रमिक एक्सप्रेस गाड्या चालविल्या जात आहे. तसेच विशेष गाड्यांची घोषणा केली गेली आहे. त्याप्रमाणे महत्वांच्या स्टेशनाच्या दरम्यान विशेष गाड्या पुढील महिन्यांभर चालविल्या जाण्याची शक्यता आहे.