Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती; कोरोनामुळे बंद असलेल्या ‘प्रगती एक्स्प्रेस’, ‘पुणे-भुसावळ एक्स्प्रेस’ रेल्वेगाड्या पुन्हा धावणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indian Railways | कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक वाहनांवर निर्बंध लावण्यात आलं होतं. त्याचबरोबर अनेक रेल्वे (Indian Railways) देखील बंद करण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता मध्य रेल्वे प्रशासनाकडून (Central Railway Administration) रेल्वे गाड्या पुन्हा सुरळीत करण्यात येत आहे. पुणे-मुंबई (Pune-Mumbai) दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस (Pragati Express), सह पुणे-भुसावळ एक्स्प्रेस (Pune-Bhusawal Express) आता धावणार आहे.

पुणे-मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस, सह पुणे-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी  नाशिक मार्गे धावत असल्याने पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची दोन सोय होणार आहे. या दोन्ही गाड्या साधारण 22 महिन्यानंतर आता पुन्हा धावणार आहेत. 19 जानेवारीपासून या गाड्या ट्रॅकवर येणार असल्याने प्रवाशांची आता सोय होणार आहे. (Indian Railways)

मागील अनेक दिवसांपासून प्रगती एक्स्प्रेस (Pragati Express) सुरू करावी अशी मागणी प्रवाशांची होती. त्याला आता पुर्णविराम मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून पुणे व सोलापूर विभागाला रेक तयार ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यानुसार दोन्ही विभागाने त्याप्रमाणे रेक तयार करून ठेवला आहे. १९ जानेवारीपासून प्रगती एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्याहून भुसावळला जाणाऱ्या गाडीसाठी सोलापूर-पुणे धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसचा (Hutatma Express) रेक वापरला जातो. त्यामुळे याबाबत सूचना सोलापूर विभागाला दिल्या आहेत. हुतात्मा व भुसावळ एक्स्प्रेस साठी 2 रेक आवश्यक असतात. ते रेक तयार झालेत. त्याचबरोबर सोलापूर-मिरज एक्स्प्रेसला (Solapur-Miraj Express) प्रतिसाद नसल्यामळे या गाडीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. ही गाडी आता पुणे विभागातील (Pune Division) कोल्हापूर स्थानकावरून सुटेल मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर मार्गे कलबुर्गी (गुलबर्गा ) येथे दाखल होईल. ही गाडीही लवकरच धावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Web Title : Indian Railways | Central Railway to start Pragati Express, Pune-Bhsawal Express soon 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Supreme Court On Bride Jewellery | सुप्रीम कोर्ट ! सुरक्षेसाठी वधुचे दागिने आपल्या जवळ ठेवणे क्रुरता नाही

Pune Corporation | पुणे महापालिका हद्दीतील बांधकामे सरसकट नियमित होणार नाहीत, मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागणार