Indian Railways : वेटिंग लिस्टचं टेन्शन दूर करणार रेल्वेची ‘ही’ योजना, असा सोपा होणार प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टचं टेन्शन दूर करण्याच्या दृष्टीने प्रवाशांसाठी एक योजना सुरु केली आहे. रेल्वेचं तिकीट बुक करताना आता वेटिंग लिस्टचं टेन्शन घेण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने कन्फर्म तिकीट देण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळं वेटिंग तिकीट असेल तरी प्रवाशांना रेल्वेमध्ये सीट मिळणार आहे.

रेल्वेने बनवली क्लोन ट्रेन चालवण्याची योजना

भारतीय रेल्वेने लांब वेटिंग लिस्टमुळे प्रवाशांना होणार त्रास कमी करण्यासाठी क्लोन ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. रेल्वेच्या क्लोन ट्रेन मध्ये असे प्रवाशी प्रवास करू शकतात ज्यांना वेटिंग तिकीट मिळालं आहे. क्लोन ट्रेनमुळे प्रवाशांना तिकीट कन्फर्म झाल्याची चिंता राहणार नाही.

कशी असणार क्लोन ट्रेन?

क्लोन ट्रेन इतर स्पेशल ट्रेन सारखीच असणार आहे. रेल्वेने या ट्रेनला क्लोन ट्रेन नाव यासाठी दिलं आहे कारण या ट्रेनचा नंबरही तोच असणार ज्या ट्रेनचं तुम्हाला वेटिंग तिकीट मिळालं आहे.

क्लोन ट्रेन कशी धावेल?

ज्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेची वेटिंग लिस्ट खूपच लांब आहे अशा मार्गावर क्लोन गाड्या चालवण्याचे नियोजित आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विशेष गाड्यांमध्ये धावण्याची वेटिंग लिस्ट जास्त असेल तर अशा अवस्थेत आणखी एक ट्रेनची व्यवस्था केली जाईल. तथापि, क्लोन ट्रेन मुख्य ट्रेन सुटल्यानंतर अंदाजे एक तासाने धावेल. मुख्य रेल्वे मार्ग आणि प्लॅटफॉर्मवरून क्लोन गाड्या देखील धावतील. यामुळे ज्या प्रवाशांना वेटिंग तिकीट असेल त्यांना सुविधा उपलब्ध होईल.

कोण प्रवास करू शकेल ?

ज्या प्रवाश्यांची तिकिटांची वेटिंग अधिक काळ आहे, ते रेल्वेच्या क्लोन ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील. उदाहरणार्थ, बिहारहून दिल्लीकडे जाणारी संपूर्ण क्रांती एक्स्प्रेसची उच्च प्रतीक्षा यादी असल्यास, रेल्वे त्याच क्रमांकाची आणखी एक रेल्वेगाडी सुटल्यानंतर एक तास किंवा काही वेळाने दिल्लीकडे धावेल. ज्यामध्ये बिहार संपूर्ण क्रांतीच्या प्रतीक्षा यादीची तिकिटे असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

12 सप्टेंबरपासून 80 नवीन गाड्या धावतील

12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 40 जोड्या म्हणजेच 80 नवीन विशेष गाड्या धावणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार 12 सप्टेंबरपासून नवीन गाड्यांसाठी 10 सप्टेंबरपासून आरक्षण सुरू होईल. या गाड्या यापूर्वीच चालणार्‍या 230 गाड्यांव्यतिरिक्त असणार आहेत.