रेल्वे मंत्रालयाची घोषणा ! भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आपल्या सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन प्लांट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय रेल्वेच्या सर्व 86 कोविड हॉस्पिटलमध्ये रेल्वे आपले ऑक्सीजन प्लांट लवकरच स्थापन करणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, ते संपूर्ण भारतात 86 रेल्वे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात क्षमता वाढवण्याची योजना बनवत आहेत, ज्यांची ओळख कोविड हॉस्पिटल म्हणून केली जाईल. सध्या चार ऑक्सीजन प्लांट अगोदरच सुरू झाले आहेत, तर 52 साठी मंजूरी दिली आहे तर उर्वरित 30 विविध प्रोसेसमध्ये आहेत.

रेल्वेचे सर्व जनरल मॅनेजर्सना एमअँडपी अंतर्गत ऑक्सीजन प्लांट्सला मंजूरी देण्यासाठी प्रकरणात 2 कोटीपर्यंतची सँक्शन पॉवर दिली गेली आहे. तर कोविड ट्रीटमेंटसाठी बेडची संख्या जी सध्या 2539 आहेत ती वाढवून 6972 केली जात आहे. आयसीयू बेडची संख्या सुद्धा कोविड हॉस्पिटल्स मध्ये जी आतापर्यंत 273 होती ती 573 केली जाणार आहे. व्हेंटिलेटर्स सुद्धा 62 ने वाढवून 296 केले जाणार आहेत. रेल्वे हॉस्पिटलमध्ये महत्वाची वैद्यकिय उपकरणे जसे बीआयपीएपी मशीन, ऑक्सीजन कन्संटेटर, ऑक्सीजन सिलेंडर इत्यादी जोडण्यासाठी सतत पावले उचलली जात आहे.

प्रत्येक दिवशी एक हजार कर्मचारी संक्रमित
रेल्वेने हे सुद्धा निर्देश जारी केले आहेत की, ज्यामध्ये कोविड प्रभावित कर्मचार्‍यांना आवश्यकतेनुसार पॅनल हॉस्पिटलमध्ये रेफरल आधारवर भरती केले जाऊ शकते. रेल्वे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय आपत्ती स्थितीला तोंड दण्यासाठी मजबूत पायाभूत संरचनेची सुरूवात केली जाईल. रेल्वेच्या अधिकृत आकड्यानुसार जवळपास 2000 कर्मचार्‍यांनी आतापर्यंत कोविडमुळे आपला जीव गमावला आहे. तर दररोज सुमारे एक हजार जण या व्हायरसने संक्रमित होत आहेत. आतापर्यंत सुमारे 4.32 लाख रेल्वे कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनने रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून रेल्वे कर्मचार्‍यांना फ्रंटलाइन वर्कर घोषित करण्याची मागणी केली आहे.