Indian Railways सोबत अवघ्या रू. 4000 मध्ये सुरू करा आपला बिझनेस! दरमहिना होईल 80,000 रुपयांपर्यंत कमाई, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे (Indian Railways) ची सहायक कंपनी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC) ट्रेन तिकिट बुकिंगपासून अनेक सुविधा पुरवते. इतकेच नव्हे, आप IRCTC च्या मदतीने दर महिना हजारो रुपये कमावू (how to earn money) शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. (Indian Railways)

 

यासाठी तुम्हाला केवळ हे करावे लागेल की, तिकिट एजंट (Ticket Agent) बनावे लागेल. ज्या प्रकारे रेल्वे काऊंटर (Railway ticket counter) वर क्लर्क तिकिट देतात, त्याच प्रमाणे तुम्हाला सुद्धा प्रवाशांना तिकिट विक्री करावी लागेल.

 

कसे करावे अप्लाय?
सर्वप्रथम ऑनलाइन तिकिट विक्रीसाठी IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन एजंट बनण्यासाठी अप्लाय करावे लागेल. यानंतर तुम्ही एक ऑथराईज्ड तिकिट बुकिंग एजंट (Ticket booking agent) बनू शकता. नंतर तुम्ही तिकिट बुक करू शकता. तिकिट बुक केल्यानंतर IRCTC कडून एजंटला चांगले कमिशन मिळते. (Indian Railways)

 

किती मिळते कमीशन?
कोणत्याही प्रवाशासाठी नॉन एसी कोचचे तिकिट बुक केल्यास 20 रुपये प्रति तिकिट आणि एसी क्लासचे तिकिट बुक केल्यास 40 रुपये प्रति तिकिट कमीशन मिळते. याशिवाय तिकिटाच्या किमतीच्या एक टक्के सुद्धा एजंटला दिले जाते.

IRCTC चे एजंट बनण्याचा आणखी एक मोठा फायदा हा आहे की यामध्ये तिकिट बुक करण्याचे कोणतेही लिमिट नाही. महिन्यात तुम्ही हवे तेवढे तिकिट बुक करू शकता. याशिवाय 15 मिनिटात तात्काळ तिकिट बुक करण्याचा सुद्धा पर्याय मिळतो. एक एजंट म्हणून तुम्ही ट्रेनशिवाय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय हवाई तिकिट सुद्धा बुक (Flight Ticket Booking) करू शकता.

 

किती होईल कमाई?
एका महिन्यात किती तिकिट बुक करायची याची एजंटला मर्यादा नाही.
एक एजंट प्रति महिना 80,000 रुपयांपर्यंत रेग्युलर इन्कम मिळवू शकतो.
जर काम कमी असेल, मंदी असेल तरीही सरासरी 40-50 हजार रु. ची कमाई होऊ शकते.

 

किती फी द्यावी लागेल?
बुकिंग एजन्सीसाठी दोन प्लॅन आहेत, पहिल्या प्लॅनसाठी एकवर्षासाठी चार्ज आहे 3,999 रुपये.
दूसर्‍या प्लॅनमध्ये दोन वर्षासाठी एजन्सी चार्ज 6,999 रुपये आहे.
एक एजंट म्हणून एका महिन्यात 100 तिकिट बुक केल्यास प्रति तिकिट 10 रुपयांची फी द्यावी लागते.

 

तर एका महिन्यात 101 ते 300 तिकिट बुक केल्यास प्रति तिकिट 8 रुपये आणि
एक महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकिट बुक केल्यास प्रति तिकिट पाच रुपयांची फी द्यावी लागते.

 

Web Title :- Indian Railways | earn money start your own business with irctc indian railway earn rs 80000 income every month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Gram Panchayat recruitment scam | पुणे मनपामध्ये समाविष्ट झालेल्या समाविष्ट 23 गावांतील ग्रामपंचायत नोकर भरती ‘महा’ घोटाळा! 14 ग्रामसेवक, 3 कृषी विस्तार अधिकारी निलंबित

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली, ते विसरलात का?’

PO Monthly Income Scheme | दर महिना 2500 रुपये मिळवण्यासाठी एक रक्कमी किती जमा करावे लागतील; जाणून घ्या सविस्तर