स्पेशल ट्रेनसाठी रेल्वेनं बदलला नियम, आता ‘एवढ्या’ दिवसांपूर्वी करू शकता तिकिट बुकिंग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कोरोनो व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनदरम्यान भारतीय रेल्वे 15 जोडी (अप-डाऊन) स्पेशल ट्रेन चालवत आहे. आता रेल्वेने या स्पेशल ट्रेनच्या तिकिट बुकिंगमध्ये मोठा बदल केला आहे. यासाठी 30 दिवस अगोदर तिकिट बुकिंग करता येऊ शकते. पहिल्या जारी केलेल्या निर्देशांनुसार राजधानी विशेष ट्रेनचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सात दिवस आधीच करता येऊ शकत होते.

रेल्वे मंत्रालयाने ट्विट केले आहे की, भारतीय रेल्वे सध्या 12 मे 2020 पासून 15 जोडी स्पेशल ट्रेन चालवत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आता या 15 जोडी विशेष ट्रेनच्या काही नियम आणि अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक (आय अ‍ॅण्ड पी) राजेश दत्त बाजपेयी यांच्यानुसार आता या स्पेशल ट्रेनमध्ये तात्काळ बुकिंगची परवानगी असणार नाही. पुढील निर्देशानुसार या ट्रेनमध्ये आरएसी किंवा वेटींग लिस्ट तिकिट जारी केले जातील.

या शिवाय रेल्वेने सांगितले की, आता तिकिट बुकिंग आणि रद्द करण्याची सुविधा पोस्टऑफिस आणि तिकिट केंद्रांसह कम्प्युटरकृत पीआरएस काऊटर्सना दिली आहे. याशिवाय ऑनलाईनसुद्धा तिकिट बुक करता येईल. तिकिटांच्या बुकिंगमध्ये बदल 31 मेपासून सुरू होणार्‍या विशेष ट्रेनसाठी सुद्धा लागू आहेत.

तसेच आयआरसीटीसीचे अधिकृत एजंट, रेल्वे परिसर प्रवासी आरक्षण प्रणाली आणि सामान्य सेवा केंद्रांना सुद्धा ऑफलाईन तिकिट बुक करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.

भारतीय रेल्वेने प्रवासी ट्रेनचे संचालन हळुहळु सुरू करण्याच्या योजनेंतर्गत 12 मे रोजी 15 जोडी एसी ट्रेन सुरू केल्या होत्या. या स्पेशल ट्रेन नवी दिल्ली, डिब्रूगढ़, आगरतळा, हावड़ा, पाटना, बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरु, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावीला कनेक्ट करतात.

याशिवाय रेल्वेने प्रवासी मजूरांसाठी श्रमिक स्पेशल आणि एसी स्पेशल ट्रेननंतर 1 जूनपासून 100 जोडी (अप-डाउन) नॉन एसी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनसाठी तिकिट बुकिंग 21 मे रोजी सुरू झाले आहे.