भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या ११ हॉर्नमागे ‘हे’ आहेत अर्थ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण नेहमी रेल्वेचे विविध प्रकारचे हॉर्न ऐकत असतो. कधी एकच हॉर्न तर कधी सलग पण कर्कश हॉर्न ऐकून आपण रुळावरून धडाडत जाणाऱ्या रेल्वेला पाहत असतो किंवा हॉर्न ऐकत असतो मात्र वेगवेळ्या पद्धतीने वाजवल्या जाणाऱ्या या हॉर्नमागे असे कोणते ‘ कोड ‘ आहेत , हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना असते. पाहू या कोणकोणते हॉर्न असतात आणि त्यामागे त्याचे काय अर्थ असतात.

भारतीय रेल्वेला एकूण ११ प्रकारचे वेगवेगळे हॉर्न वाजविण्याचे बंधनकारक आहे मात्र त्या- त्या परिस्थितीनुसार या हॉर्नचा वापर करणे अनिवार्य आहे. जर चालकाने एकदा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, ट्रेन यार्डमध्ये जाण्यासाठी तयार आहे. दोनदा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, चालक गार्डला ट्रेन सुरू करण्याचा संकेत मागत आहे. तीन वेळा छोटा हॉर्न वाजवला तर ट्रेन नियंत्रणाबाहेर गेली आहे.

याने गार्डला संकेत दिला जातो की, व्हॅक्यूम ब्रेकचा वापर करावा. चार वेळा छोटा हॉर्न वाजवला तर समजून घ्या की, इंजिनमध्ये बिघाड आहे आणि गाडी पुढे जाऊ शकणार नाही किंवा काही दुर्घटना झाली आहे. चालकाने एकदा मोठा हॉर्न आणि एक छोटा हॉर्न वाजवला तर याने गार्डला संकेत दिला जातो की, एकदा गाडी सुरू होण्यापूर्वी त्याने ब्रेक पाइप सिस्टीमची तपासणी करावी.

तसेच जर चालकाने दोन मोठे आणि दोन छोटे हॉर्न वाजवले तर याचा अर्थ होतो की, गार्डने इंजिनकडे यावं.तसेच जर चालकाने दोन मोठे आणि दोन छोटे हॉर्न वाजवले तर याचा अर्थ होतो की, गार्डने इंजिनकडे यावं. चालकाने पुन्हा पुन्हा मोठा वाजवला तर गाडी कोणत्याही स्टेशनवर न थांबता पुढे जाणार आहे.

चालकाने थांबून थांबून मोठा हॉर्न वाजवला याचा अर्थ होतो की, गाडी रेल्वे फाटकाला क्रॉस करत आहे. एक मोठा आणि एक छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, रेल्वे विभागली जात आहे. त्यासोबतच चालकाने दोन छोटे आणि एक मोठा हॉर्न वाजवला तर कुणीतरी आपातकालीन चेन ओढली आहे. चालकाने 6 वेळा छोटा हॉर्न वाजवला तर याचा अर्थ होतो की, पुढे काहीतरी मोठा धोका आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या