Indian Railways Hikes Fare : रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! ट्रेनचे भाडे वाढले, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने प्रवास भाडे वाढवून रेल्वे प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. रेल्वेने जारी केलेल्या वक्तव्यानुसार, कमी अंतराच्या गाड्यांसाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेने भाडेवाढीचे अजब कारण सांगितले आहे. रेल्वेचा भाडे वाढवण्यामागील हा तर्क आहे की, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली आहे, जेणेकरून रेल्वेमध्ये जास्त लोकांनी चढू नये. रेल्वेने वाढवलेल्या प्रवासी भाड्याचा परिणाम 30-40 किमी पर्यंत प्रवास करणार्‍या प्रवाशांवर होईल.

रेल्वेने सांगितले की, वाढवलेल्या भाड्याचा परिणाम केवळ 3 टक्के रेल्वे गाड्यांवर होईल. कोविडचा प्रकोप अजूनही आहे आणि काही राज्यांमध्ये स्थिती बिघडत आहे. अशावेळी वाढलेल्या भाड्याने ट्रेनमधील गर्दी रोखणे आणि कोविड पसरण्यापासून रोखण्यासाठी रेल्वेची सक्रियता म्हणून याकडे पाहिले पाहिजे. रेल्वेनुसार, अगोदरच प्रवाशाच्या प्रत्येक प्रवासात मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तिकिटांवर मोठी सबसिडी दिली जाते.

किती होईल भाडे
रेल्वेनुसार, वाढवलेले दर समान अंतरासाठी धावणार्‍या मेल/एक्सप्रेस ट्रेनच्या भाड्याच्या आधारावर ठरवण्यात आले आहेत. म्हणजे आता प्रवाशांना छोट्या प्रवासासाठी सुद्धा मेल/एक्सप्रेसच्या बरोबरीने भाडे द्यावे लागेल. अशावेळी 30 ते 40 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता जास्त भाडे द्यावे लागेल. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेला 22 मार्च 2020 ला रेल्वे गाड्यांचे संचालन बंद करावे लागले होते.