नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways | अनेक रेल्वे प्रवासी लांब पल्याचा प्रवास करण्यासाठी तिकिट बुकिंग करत असतात. मात्र, बुंकिग झाल्यानंतर काही कारणाने त्या दिवशी ट्रेन (Indian Railways) रद्द झाली असते. यामुळे प्रवासी पैसे परत मिळवण्यासाठी टीडीआर (TDR) किंवा तिकीट कॅन्सलेशन (Ticket Cancellation) भरण्यासाठी धावपळ करत असतात. मात्र, आता यासारख्या गोष्टी करावे लागत नाहीये. कारण तुमची ट्रेन (Train) रद्द झाली असेल तर तुमचे सर्व पैसे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणतेही काम करण्याची गरज नाही. याबाबत माहिती रेल्वे विभागाकडून (Railway Department) देण्यात आलीय.
ट्रेन (Indian Railways) रद्द झाल्यानं तिकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी टीडीआर (TDR) भरावा लागेल का, असा प्रश्न एका प्रवाशांनी रेल्वे विभागाला ट्वीट करत विचारला होता.
त्यावर रेल्वे विभागानं ट्वीट करूनच स्पष्टीकरण दिलं आहे.
तर, कामकाजाच्या कारणास्तव रद्द करण्यात आलेली ट्रेन कधीही सुरू केली जावू शकते.
तुमच्या ट्रेनचं स्टेटस रेल्वेच्या http://indianrail.gov.in/enquiry/PnrEnquiry.html वर सतत तपासावे अथवा 139 या ट्रेन चौकशी नंबरवर फोन करून माहिती घ्यावी.
असं सांगण्यात (Railway Department) आलं आहे.
दरम्यान, प्रवासादरम्यान अनेक प्रवाश्यांना शुद्ध जेवणाबाबत समस्या भेडसावते. या कारणाने रेल्वेने (Indian Railways)
प्रवाश्यांना स्वच्छ आणि चविष्ट जेवण देण्यासाठी एक नवी सुविधा सुरू केलीय.
सर्व ट्रेन्समध्ये ही सुविधा देण्यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) सात्त्विक काउंसिल ऑफ इंडियासोबत काम करत आहेत.
तसेच, गार्डला आता ट्रेन मॅनेजर (Train Manager) असं संबोधण्यात येणार आहे.
2004 पासून या पदाचे नाव बदलण्याची मागणी कर्मचारी करत होते, या मागणीला रेल्वे बोर्डाकडून (Indian Railway Bord) मंजुरी मिळाली आहे.
Web Title : Indian Railways | if the train is canceled the ticket money will be returned automatically no need to file ticket cancellation or tdr marathi news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ananya Pandey | अनन्या पांडेच्या ‘प्रिंन्सेस लूक’नं चाहते झाले ‘घायाळ’, फोटो व्हायरल