रेल्वेच्या प्रवासी भाड्यात होणार वाढ, जाणून घ्या कोणत्या शहरासाठी किती भाडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने देशातील सर्व रेल्वे सेवा बंद केली होती. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा सराव रेल्वेने सुरु केला आहे. परंतु काही गाड्या ट्रायल म्हणून चालवण्यात येणार आहेत. जर प्रवाश्यांनी या गाड्यांमध्ये प्रवास केल्यास त्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण भारतीय रेल्वेने भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. ज्यांचे आरक्षण नाही त्यांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही.

6 जानेवारी पासून गाड्या चालवणार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रेल्वेने मार्च पासून गाड्या बंद केल्या. आता 6 जानेवारी पासून या गाड्या पुन्हा चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मैलानी ते गोरखपूर या मार्गावर रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. 22 मार्च 2020 पासून या गाड्या बंद आहेत. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने आरक्षण अनिवार्य केले आहे.

ऑनलाईन आरक्षणाची सोय

प्रवाशाला प्रवास करण्याच्या कोणत्याही अंतरासाठी आरक्षण करणे अनिवार्य आहे. तसेच ट्रेन येण्यापूर्वी अर्धा तास आधी तिकिट खिडकी उघडली जाईल. या ठिकाणी देखील प्रवाशांना आरक्षणाचे तिकीट मिळे. तसेच, प्रवासी ऑनलाईन आरक्षण करु शकतात.

असे असेल भाडे

– मैलानी जंक्शन ते लखीमपूर – पूर्वीचे भाडे 40 रुपये, आता भाडे 55 रुपये
– मैलानी जंक्शन ते हरगाव – पूर्वीचे भाडे – 45 रुपये, आता 60 रुपये
– मैलानी जंक्शन ते सीतापूर – पूर्वीचे भाडे – 55 रुपये, आता 70 रुपये
– मैलानी जंक्शन ते लखनौ जंक्शन – पूर्वीचे भाडे – 75 रुपये, आता 90 रुपये
– मैलानी जंक्शन ते गोरखपूर – पूर्वीचे भाडे – 175 रुपये, आता 190 रुपये
या सर्व तिकिट दरामध्ये आरक्षण शुल्क 15 रुपये समाविष्ट आहे

या गाड्या 1 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहतील

– वारणसी ते जम्मू ते जम्मू )02237/02238) दररोज चालवण्यात येईल.
– अर्चना सुपरफास्ट (02355/02356) दर रविवारी सकाळी आणि बुधवारी सकाळी ऑपरेट केले जाईल.
– श्री शक्ती (02461/62) नवी दिल्ली ते कटरा पर्यंत चालवण्यात येईल.