Indian Railways | प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! आज 1 जून 2022 रोजी रेल्वेच्या 191 गाड्या रद्द; जाणून घ्या सविस्तर

Advt.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी (Railway Passengers) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज 1 जून 2022 रोजी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) तब्बल 191 गाड्या रद्द करण्यात (Indian Railways) आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्याआगोदर कोणत्या गाड्या रद्द आहेत. याबाबत माहिती करुन घेणे आवश्यक आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रेल्वे दररोज कॅन्सल ट्रेन, अथवा रिशेड्युलची यादी जारी करत असते. याबाबत माहिती रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Train Cancelled List of 1st June 2022)

 

गाड्या रद्द करणे, वळवणे अथवा वेळापत्रक बदलण्यामागे अनेक वेगवेगळे कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे रेल्वे रुळांची देखभाल आहे. या ट्रॅकवरून दररोज हजारो गाड्या जातात. अशा परिस्थितीमध्ये, या योग्य देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. रेल्वे रुळांची काळजी घेण्यासाठी अनेक गाड्या रद्द कराव्या लागत आहेत. त्याचबरोबर, खराब हवामानामुळे अथवा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रेल्वेला अनेकदा गाड्या रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे वेळापत्रकाबाबत (Schedule) माहिती करुन घेणे महत्वाचे आहे. असं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं आहे. (Indian Railways)

 

दरम्यान, रेल्वेने 1 जून 2022 रोजी एकूण 191 ट्रेन रद्द केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द होण्यामागे देखभाल-दुरुस्ती हेच कारण आहे. तसेच, रेल्वेने आज सुमारे 6 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याचा आणि 9 गाड्या वळवण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत तुम्ही करणार असलेल्या प्रवासादरम्यान, याबाबत माहिती घेणे आवश्यक असणार आहे.

 

रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांची यादी याप्रमाणे तपासा –

– रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटला भेट द्या.

– Exceptional Trains पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.

– रद्द करा, रीशेड्युल करा आणि डायवर्ट ट्रेनच्या यादीवर क्लिक करा.

– या तिघांची यादी तपासल्यानंतर घराबाहेर जा.

 

Web Title :- Indian Railways | indian railways information for railway passengers today railways canceled 191 trains see full list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा