Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या

नवी दिल्ली : Indian Railways ने ट्रेनमध्ये MST (Monthly Seasonal Ticket) वर प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. Covid 19 मुळे अनारक्षित मेल/एक्सप्रेस विशेष रेल्वे गाड्यांमध्ये सीझन तिकिटांवर प्रवासाची परवानगी नव्हती. आता अनारक्षित काऊंटर, एटीव्हीएम/सीओ-टीव्हीएम,यूटीएस ऑन मोबाइलवरून सीझन तिकिटे जारी करणे/नूतनीकरण करण्याची सुविधा (Indian Railways) उपलब्ध झाली आहे.

ज्या रेल्वे प्रवाशांच्या सीझन तिकिटाचा उर्वरित प्रवास कालावधी लॉकडाऊनमुळे रद्द झाला होता ते तेवढ्या दिवसांच्या कालावधीची वैधता पुन्हा उत्तर रेल्वेच्या यूटीएम काऊंटरवरून वैध करू शकतात.

मात्र त्या कालावधी दरम्यान त्यांना प्रवाससेवा देणारी रेल्वे गाडी रद्द झालेली असावी किंवा केंद्र/राज्य सरकारांद्वारे लावल्या केलेल्या प्रतिबंधांमुळे प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नव्हती.

5 डिव्हिजनच्या ट्रेनचा समावेश
Indian Railways new Train Timetable : Northern Railways ने MST किंवा सीझनची सुविधा 5 डिव्हिजनच्या ट्रेनमध्ये दिली आहे.

Delhi Division मध्ये 33 ट्रेनमध्ये एमएसटीवर प्रवास
फिरोजपुर डिव्हिजनमध्ये 10 ट्रेनमध्ये प्रवासाची सूट दिली गेली आहे. यामध्ये लुधियाना ते लोहियान विशेष जंक्शनच्या दरम्यान धावणार्‍या सर्व ट्रेनचा समावेश आहे. तर Delhi Division मध्ये 33 ट्रेनमध्ये एमएसटीवर प्रवास करता येईल.

लखनऊ डिव्हिजनमध्ये 5 ट्रेन
लखनऊ डिव्हिजनमध्ये 5 ट्रेनमध्ये या तिकिटावर प्रवास करू शकता. यामध्ये वाराणसी ते प्रतापगढ, फैजाबाद ते लखनऊ, लखनऊ ते कानपुर, वाराणसी ते सहारनपुरच्या ट्रेनचा समावेश आहे.

मुरादाबाद डिव्हिजनच्या 4 ट्रेनमध्ये MST

दुसरीकडे मुरादाबाद डिव्हिजन (Moradabad Division) च्या 4 ट्रेनमध्ये एमएसटी चालेल. या ट्रेनमध्ये
मुरादाबाद ते सहारनपुर, गजरौला ते नजीबाबाद, बरेली ते दिल्ली धावणार्‍या ट्रेन आणि कानपुर-सीतापुर सिटी
ट्रेन आहे. अंबाला डिव्हिजनमध्ये 4 ट्रेनमध्ये एमएसटीने प्रवासाची परवानगी आहे.

हे देखील वाचा

Yerwada Jail | येरवडा कारागृहाचे  अधीक्षक यु. टी. पवार यांची ‘उचलबांगडी’

Dr. Narendra Dabholkar | 5 आरोपींवर मंगळवारी होणार आरोप निश्चिती ! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात, सुनावणीतील महत्त्वाचा टप्पा

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला विक्रम, एक दिवसात झाला तब्बल 60 हजार कोटीचा फायदा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Indian Railways | indian railways monthly season ticket allowed in special trains in northern railways

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update