Indian Railways | रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! 12 फेब्रुवारीपर्यंत ‘या’ गाड्या रद्द; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Indian Railways | रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती (Indian Railways) समोर आली आहे. 29 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून वातावरणात बदल झाला. अचानक कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे अनेक गाड्या रद्द केल्या. मात्र आता दुहेरीकरणाच्या (Doubling) कामामुळे 12 फेब्रुवारीपर्यंत काही गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर काही ट्रेनचे मार्ग देखील बदलले आहेत.

 

जबलपूर विभागातील (Jabalpur Division) कटनी-सिंगरौली रेल्वे विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील गाड्या 10 फेब्रुवारीपर्यंत रद्द केल्या आहेत. यात सल्हाना, पिपरिया कलान आणि खन्ना बंजारी सारख्या अनेक स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय धनबाद विभागात 12 फेब्रुवारीपर्यंत दुहेरीकरण आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम सुरू राहणार आहे. असं रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांने सांगितलं आहे. (Indian Railways)

 

‘या’ गाड्या रद्द –

भोपाळ – सिंगरौली एक्स्प्रेस (- 22165) 29 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीपर्यंत रद्द.

सिंगरौली – भोपाळ एक्स्प्रेस (-22166) 1 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारीपर्यंत रद्द.

सिंगरौली – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (- 22167) 30 जानेवारी आणि 6 फेब्रुवारीपर्यंत रद्द.

हजरत निजामुद्दीन – सिंगरौली एक्स्प्रेस (- 22168) 31 जानेवारी आणि 7 फेब्रुवारीपर्यंत रद्द.

हावडा – जबलपूर एक्स्प्रेस (-11448) 8 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान रद्द.

जबलपूर – हावडा एक्स्प्रेस (-11447) 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत रद्द.

भोपाळ – सिंगरौली एक्स्प्रेस (-22165) 5 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी रोजी रद्द.

सिंगरौली – भोपाळ एक्सप्रेस (-22166) 8 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी रोजी रद्द.

सिंगरौली – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (- 22167) 6 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी रोजी रद्द.

हजरत निजामुद्दीन – सिंगरौली एक्स्प्रेस (- 22168) 7 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी रोजी रद्द.

मदार जंक्शन – कोलकाता एक्सप्रेस (- 19608) 7 फेब्रुवारी रोजी रद्द.

कोलकाता – मदार जंक्शन एक्सप्रेस (-19607) 10 फेब्रुवारी रोजी रद्द.

अहमदाबाद – कोलकाता एक्सप्रेस (-19413) 9 फेब्रुवारी रोजी रद्द.

कोलकाता – अहमदाबाद एक्सप्रेस (-19414) 12 फेब्रुवारी रोजी रद्द.

हावडा – भोपाळ एक्सप्रेस (-13025) 7 फेब्रुवारी रोजी रद्द.

भोपाळ – हावडा एक्स्प्रेस (-13026) 9 फेब्रुवारी रोजी रद्द.

 

बदललेला मार्ग –

सिंगरौली – पाटणा एक्सप्रेस (- 13343) 29 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान सिंगरौलीऐवजी चोपनहून पाटण्यासाठी सुटेल.

पाटणा – सिंगरौली एक्स्प्रेस (- 13350) 28 जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान सिंगरौलीऐवजी चोपणपर्यंत धावेल.

 

Web Title :- Indian Railways | indian railways train cancelled train cancel news today till 12 feb 2022 Marathi News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा