अ‍ॅटोमॅटिक तिकीट तपासणीपासून रोबोटपर्यंत, ‘कोरोना’च्या काळादरम्यान अशा प्रकारे ‘हायटेक’ झालं Indian Railways (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना महामारीच्या संसर्गापासून प्रवाशांना वाचवण्यासाठी इंडियन रेल्वे सुरक्षेच्या विविध उपाययोजना राबवत आहे. यापैकीच एक उपक्रम म्हणजे रेल्वेने आता स्टेशनांवर अ‍ॅटोमॅटिक तिकीट चेकिंग मशिन लावण्यास सुरूवात केली आहे. नागपुर रेल्वे स्टेशनवर रेल्वेने देशातील पहिले अ‍ॅटोमॅटिक चेकिंग मशिन लावले आहे. रेल्वेच्या अधिकार्‍यांनुसार हे मशिन तिकीट तपासणीसह प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासण्याचेही काम करत आहे.

पुण्यात रेल्वे सुरक्षा दलाने रोबोट कॅप्टन अर्जुनची सुरूवात केली आहे, जो रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यासह संभाव्य संसर्गापासून प्रवाशांना सुरक्षा देईल. रेल्वेने ट्विट करून म्हटले आहे की ‘कॅप्टेन अर्जुन‘ एक आधुनिक रोबोट : जो आर्टिफीशियल इन्टेलीजन्सीने सुसज्ज आहे. थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायजेशन सारख्या कामासह ड्रोन कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डींग सुद्धा करू शकतो.

प्रवाशांची स्क्रीनिंग करत आहे रोबोट कॅप्टन अर्जुन

रोबोट कॅप्टन अर्जुन मोशन सेंसर, कॅमेर्‍याने सुसज्ज आहे. यामध्ये एक इनबिल्ट सायरन, एक्सट्रा अ‍ॅक्टिव्हिटी, स्पॉटलाइट एच -264 प्रोसेसर आहे. याशिवाय रेकॉर्डींगसाठी एकवेगळी स्टोरेज सिस्टम आहे. कॅप्टन अर्जुन प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करतो, तापमान रेकॉर्ड करतो आणि तापमान जास्त असल्यास अलार्म वाजवतो.

सॅनिटायजर-मास्कसाठी वेंडींग मशिन

भारतीय रेल्वेत प्रवाशांना प्रवासात सक्तीने सुरक्षा नियमांचे पालनही करावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे लोकांना संसर्गाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी रेल्वेने स्वयंचलित मशिन लावल्या आहेत. पटणा जंक्शनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेने स्वयंचलित फेस मास्क आणि हँड सॅनिटायजर डिस्पेन्सर मशिन लावली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या रतलाम स्टेशनवर प्रवाशांचे सामान सॅनिटाईज करण्यासाठी स्टेशनच्या प्रवेशद्वारावर लगेज सॅनिटायजर मशिन लावले आहे, ज्याद्वारे सतत प्रवाशांचे सामान सॅनिटाईज केले जात आहे. तर, गुवाहाटी रेल्वे स्टेशनवर सुद्धा हात धुण्याच्या सुविधेसाठी टच फ्री वॉश बेसिन लावण्यात आले आहे.