Indian Railways-IRCTC | रेल्वे प्रवाशांच्या या समस्यांचे निराकरण करते ‘रेल्वे हेल्पलाईन 139’, पहा यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways-IRCTC | भारतीय रेल्वे (Indian Railways- IRCTC) च्या प्रवाशांच्या अनेक समस्यांचे निराकरण ‘रेल्वे हेल्पलाईन 139’ (Railway Helpline 139) द्वारे होते. या हेल्पलाईनचा वापर प्रवासादरम्यान चौकशी आणि तक्रार (inquiries and complaints) नोंदवण्यासाठी केला जातो. जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असताना काही समस्या आल्यास या हेल्पलाईनवर कॉल करून माहिती मिळवू शकता.

हा नंबर केवळ एकीकृत सेवा (Integrated Services) प्रदान करण्यासाठी आहे. रेल्वेनुसार, प्रवासी सिक्युरिटी, तक्रारी, खाणे-पिणे आणि सतर्कतासंबंधी माहिती मिळवू शकता.

वैद्यकीय मदत, दुर्घटनेची माहिती, ट्रेनसंबंधी तक्रारी, स्टेशनसंबंधी तक्रारी, भाडे आणि पार्सलसंबंधी चौकशी, आपले सामान ट्रॅक करण्यासाठी आणि इतर सामान्य चौकशीसाठी हा नंबर डायल करू शकता.

माहिती नसल्याने अनेकदा प्रवासी प्रवास करू शकत नाहीत. अशावेळी रेल्वे सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेयर करत असते.

ही हेल्पलाईन सुविधा 12 भाषांमध्ये (in 12 languages) उपलब्ध आहे. (*) बटन दाबून थेट कॉल सेंटर कर्मचार्‍याशी बोलता येऊ शकते.
किंवा प्रवासी इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) पर्याय निवडून माहिती घेऊ शकतात.

कॉलिंगदरम्यान वेगवेगळ्या गोष्टींच्या माहितीसाठी वेगवेगळे बटन दाबावे लागेल.
उदाहरणार्थ सुरक्षा आणि मेडिकल हेल्पसाठी 1 बटन दाबावे लागेल.

Web Title : Indian Railways- IRCTC | indian railways irctc rail madad helpline 139 provides solutions to these problems for railway passengers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोनं खरेदीची हीच सुवर्णसंधी ! आज पुन्हा सोन्याचा दर घसरला; जाणून घ्या

Anil Deshmukh Case | अखेर राज्य सरकार सीबीआयला देणार संबंधित आवश्यक कागदपत्रे

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 282 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी