Indian Railways | रेल्वे प्रवाशांना ‘या’ 44 गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Indian Railways | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने (Indian Railways) कडक पावलं उचलली होती. याचाच एक भाग म्हणजे प्रवाशांना आरक्षण (Reservation) असल्याशिवाय प्रवास करता येत नव्हता. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) ओसरत आहे. त्यामुळे अनेक गाड्या रुळावर येऊ लागल्या आहे. उत्तर -पश्चिम रेल्वे नियमित गाड्याऐवजी विशेष गाड्या (Special trains) सोडण्यावर भर देत आहे. कोरोनाची प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसाधरण तिकीट घेऊन प्रवास करण्यावर बंदी होती. परंतु आता नियमात शिथिलता आणण्यात येत आहे. आता 44 गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे.

या विभागातील गाड्यांना आरक्षणाची गरज नाही

रेल्वेने प्रवाशांना प्रवास करण्यासाठी काही गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. जयपूर, जोधपूर, अजमेर आणि बिकानेर या विभागातील 44 प्रवासी आणि डीएमयू गाड्यांमध्ये सर्वसाधारण तिकिटातून प्रवास करता येणार आहे. 44 गाड्यांपैकी जयपूरसाठी 7 गाड्या आहेत.

गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन

लवकरच गणेशोत्सव येत आहे. यापार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने Central Railway 72 गणपती स्पेशल ट्रेन Ganpati Special Train सोडल्या आहेत. संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाड्यांचे बुकिंग 8 जुलैपासून सुरु झाले आहे. यातील काही गाड्या फुल्ल झाल्या आहेत. या रेल्वे सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालवल्या जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून या गाड्या चालवण्यात येणार आहेत.

पुरामुळे अनेक गाड्या रद्द

बिहारमधील पुरामुळे अनेक ठिकाणी गाड्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. समस्तीपूर दरभंगा रेल्वे
विभागाच्या डाऊन मार्गावरील कामकाज 10 जुलैपासून थांबवण्यात आले आहे. तर सागौली नरकटियागंज रेल्वे विभागात सात दिवसांच्या गाड्यांचे परिचालन थांबवण्यात आले आहे. अपघातामुळे आणि पुरामुळे होणारे लक्षात घेऊन या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका, बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  indian railways irctc passengers will be able to travel without reservation in these 44 trains

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update