Indian Railways | IRCTC ने महिला ट्रेन प्रवाशांना दिली रक्षाबंधनची भेट ! आजपासून स्पेशल कॅशबॅक ऑफर सुरू, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways | भारतीय रेल्वेची (Indian Railways) सहयोगी कंपनी इंडियन रेल्वे कॅटेरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने रक्षाबंधन (Rakshabandhan) निमित्त महिला प्रवांशांसाठी (For female passenger) विशेष कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) सादर केली आहे. या अंतर्गत महिला प्रवाशांना भाड्यात सूट मिळेल. ही कॅशबॅक ऑफर लखनऊ-दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबईच्या दरम्यान धावणार्‍या तेजस एक्सप्रेस (Tejas Express) ट्रेन्ससाठी दिली जाईल.

कधीपर्यंत आहे ही ऑफर

आयआरसीटीसी (IRCTC) नुसार, आज म्हणजे 15 ऑगस्टपासून 24 ऑगस्ट 2021 च्या दरम्यान दोन प्रीमियम ट्रेन ‘तेजस’मध्ये प्रवास करणार्‍या सर्व महिला प्रवाशांना रक्षाबंधननिमित्त रेल्वे प्रवासभाड्यात 5 टक्केची विशेष कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे. लागू कालावधीत महिला कितीही वेळा प्रवास करू शकतात.

प्रत्येक कॅशबॅक ऑफर अंतर्गत भाड्यात मिळणारी सूट त्यांच्या त्याच खात्यात जमा होईल, ज्यामधून तिकिट बुक केले आहे.
कॅशबॅक ऑफर त्या महिला प्रवाशांसाठी सुद्धा आहे ज्यांनी ऑफर लाँच होण्यापूर्वी या कालावधीत तिकिट बुक केले होते.

सुरक्षेसाठी कोरोना प्रोटोकॉलचे पालन

तेजस एक्सप्रेस लखनऊ-दिल्ली-लखनऊ (ट्रेन नंबर 82501/02) आणि अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद आणि (ट्रेन नंबर 82901/02) रूटवर धावत आहेत.
सर्व प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षेसाठी प्रोटोकॉलचे पालन करत रेल्वेने 7 ऑगस्टपासून आपल्या दोन प्रीमियम प्रवास गाड्यांचे पुन्हा संचालन सुरू केले आहे.
आयआरसीटीसी सध्या आठवड्यात चार दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी दोन्ही तेजस ट्रेनचे संचालन करत आहे.

 

Web Title : Indian Railways | irctc rakshabandhan gift to women passengers today introduced special cashback offer indian railway check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 113 नवीन रुग्णांची नोंद, जाणून इतर आकडेवारी

Tanaji Sawant | ‘उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही सत्तेत आहात, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही’ (व्हिडिओ)

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 244 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी