नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways | भारतातील सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास म्हणून रेल्वेकडे (Indian Railways) पाहिले जाते. सध्या रेल्वेमधून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी तिकीट बुकिंगसाठी (Ticket Booking) ऑनलाइनचा पर्याय निवडत असतात. यासाठी काही प्रवासी आयआरसीटीसीची वेबसाइट अथवा अॅपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करतात, तर काही एजंटच्या माध्यमातून करत असतात. दरम्यान अनेकवेळा तात्काळ तिकीट काढताना येथून तुमचे तिकीट बुकिंग होत नाही. आता Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने तिकीट बुकिंगचा नवा मार्ग सांगितला आहे.
सण अथवा कोणत्याही आपत्कालीन काळात तिकीट काढण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हाला कधी अशी समस्या आली असेल तर आयआरसीटीसीने एका अॅपची माहिती दिली आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे. त्याचबरोबर तिकीट बुक करणे आधीपेक्षा सोपे होणार आहे. (Indian Railways)
Looking for a #quick, easy & #convenient way to book #train #tickets or enquire about them in just a few clicks? Download the #IRCTC #RailConnect app today! In 3 easy steps, #book your #train tickets or get 24×7 assistance. Info: https://t.co/e14vjdPrzt @AmritMahotsav
— IRCTC (@IRCTCofficial) February 10, 2022
आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅप (IRCTC Rail Connect App) डाउनलोड केल्यास तुम्हाला तिकीट बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. दरम्यान, आयआरसीटीसीनुसार या अॅपमुळे नागरिकांना कमी वेळेत तिकीट मिळणार आहे. अशी माहिती आयआरसीटीसीने (IRCTC) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.
रेल कनेक्ट अॅपच्या माध्यमातून (Rail Connect App) तीन टप्प्यांत तिकीट बुक केले जाऊ शकते.
खरंतर हे अॅप 24 तास सेवेसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त या अॅपवर वेळोवेळी सूचना देखील मिळतात, ज्यात तुम्ही अपडेट राहता.
तसेच, आयआरसीटीसी (IRCTC) एका महिन्यात केवळ सहा तिकिटे बुक करण्याची सुविधा देते. मात्र, जर आधार लिंक (Aadhaar link) असेल तर तुम्ही एका महिन्यामध्ये 12 तिकिटे बुक करू शकणार आहात.
Web Title :- Indian Railways | irctc train ticket booking by rail connect app with easy steps
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update