रेल्वे प्रवासादरम्यान इतरांसोबत : ‘हे’ कृत्य केल्यास प्रशासनाकडून होणार मोठी कारवाई

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सतत रेल्वेने प्रवास करत असाल आणि काही कारणांमुळे एखाद्या प्रवाशाला घाबरवत असाल किंवा धमकावत असाल तर आत्ताच सावध व्हा कारण भारतीय रेल्वे सध्या अशी कृती करणाऱ्याला बॅन करण्यावर विचार करत आहे. मंगळवारी रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानात प्रवास करणारे अनेक जण आपल्या सोबतच्या प्रवाशाला कधीकधी चांगलाच त्रास देतात असे आढळून आले आहे. अशा प्रवाश्यांमुळे इतर सर्वांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून भारतीय रेल्वे सध्या अशा प्रवषयांवर बॅन लावण्याचा विचार करत आहे. जर अशा प्रवाश्यांवर एअर लाईनने बॅन लावल्यास त्यांचा समावेश भारतीय रेल्वे मंत्रालय रेल्वे बॅनच्या यादीमध्ये देखील करू शकते.

अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे विभाग एअरलाईन्सकडून अशी यादी मागून घेईल आणि ती आपल्या सिस्टममध्ये फीड करेल. यानंतर असे प्रवासी काही महिन्यांपर्यंत रेल्वे तिकीट बुक करू शकणार नाहीत. अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितले की यानुसार प्रवाश्याला सहा महिण्यापर्यंत बॅन करण्यासाठी सध्या विचार सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा –