Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान केली ‘ही’ चूक तर होईल 3 वर्षांचा कारावास, भरावा लागेल दंड; जाणून घ्या

नवी दिल्ली : Indian Railways | रेल्वेने प्रवास करणार्‍यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वेने प्रवाशांसाठी अलर्ट जारी केला आहे. ट्रेनमध्ये लागणार्‍या आगीच्या दुर्घटना वाढत असल्याने रेल्वेने प्रवाशांसाठी अधिकृत नोटिफिकेशन (Official Notification) जारी केले आहे. रेल्वेने ही सक्ती प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेसाठी (Indian Railways) केली आहे.

रेल्वेने ट्विट करत म्हटले…

रेल्वेने ट्विट करत म्हटले आहे की, ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांनी ज्वालाग्राही साहित्य (Indian Railways Ban Flammable Goods) सोबत ठेवू नये आणि कुणालाही सोबत घेऊन जाऊ देऊ नये, हा एक दंडनीय गुन्हा आहे. रेल्वे कायदा, 1989 चे कलम 164 च्या अंतर्गत हा दंडनीय गुन्हा असून अशा व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

 

या गोष्टींवर लावला आहे प्रतिबंध

रेल्वेच्या डब्ब्यातून प्रवाशी केरोसिन, सुके गवत, स्टोव्ह, पेट्रोल, रॉकेल, गॅस सिलेंडर, मॅचिस, फटाके किंवा आग पसरवणार्‍या कोणत्याही वस्तू सोबत घेऊन प्रवास करूशकत नाहीत. याबाबत रेल्वेने सक्त इशारा दिला आहे.

रेल्वे परिसरात स्मोकिंग करणे गुन्हे (Smoking in railway areas is a crime)

याशिवाय आगीच्या घटना नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने बनवलेल्या योजनेंतर्गत जर कुणी स्मोकिंग करताना पकडला गेला तर त्यास 3 वर्षांपर्यंत कारावास सुद्धा होऊ शकतो. शिवाय दंडसुद्धा भरावा लागू शकतो. रेल्वे परिसरात सिगरेट/विडी पिणे दंडनीय गुन्हा आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | लाेणी काळभाेर परिसरात दहशत पसरविणारी टोळी तडीपार

Payment Aggregators | डेबिट, क्रेडिट कार्ड नंबरसह एक्स्पायरी आणि CVV सुद्धा आता ठेवावा लागेल लक्षात; RBI करतंय मोठा बदल; जाणून घ्या

Malicious Apps | सावधान ! तात्काळ आपल्या फोनमधून DELETE करा ‘हे’ 8 अ‍ॅप, Google ने केले बॅन; जाणून घ्या लिस्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  indian railways latest news ban carry flammable goods and smoking and during travel irtct news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update