‘शेषनाग’नं मोडलं Super Anaconda चं रेकॉर्ड ! एकाच दिवसात भारतीय रेल्वेनं रचला नवा इतिहास (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वोत्तम रेल्वेसेवा अशी ख्याती असलेल्या भारतीय रेल्वे सेवेने एक इतिहास आपल्या नावावर रचला आहे. आज २.८ किमी लांब शेषनाग ही ट्रेन रेल्वेकडून रुळावर उतरवली होती. ही शेषनाग ट्रेन रुळावर धावण्यासाठी रेल्वेनं चार इंजिनचा वापर करुन मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे. गुरुवारी नागपूर विभाग ते कोरबा यामध्ये २.८ किमी लांबीची शेषनाग ट्रेन २५१ वॅगनसह चालवण्यात आल्याची माहिती, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दिली.

माल वाहतुकीला लागणार वेळ वाचवण्यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात आला असून, शेषनाग या ट्रेनने ६ तासांत २६० किमी अंतराचा प्रवास पूर्ण केला. शेषनाग ट्रेनला रुळावर चालविण्यासाठी त्यामध्ये ६००० हॉर्स पॉवर क्षमता असणारे ४ इलेक्ट्रिक इंजिन बसवण्यात आले होते. यापूर्वी भारतीय रेल्वेचीच सुपर अ‍ॅनाकोंडा २ किमी लांबीची ट्रेन चालवण्यात आली होती. यामध्ये ६००० हॉर्स पॉवर असणारे तीन इलेक्ट्रिक इंजिन बसवण्यात आले होते.

तसेच रेल्वेकडून एका दिवसात सुपर अ‍ॅनाकोंडा चा रेकॉर्ड मोडला. याआधी बुधवारी रेल्वेने तीन इंजिन आणि फ्रेट गाड्या जोडून २ किमी लांबीची सुपर अ‍ॅनाकोंडा ट्रेन तयार केली. ही सुपर ट्रेन ओडिशातील लाजकुरा ते राउरकेला दरम्यान चालवण्यात आली. तर आज २.८ किमी लांबीची शेषनाग ट्रेन धावली.

१६७ वर्षात पहिल्यांदाच वेळेत पोहचली ट्रेन
बुधवारी १ जुलै रोजी रेल्वेने आपल्या नावावर आणखी एका विक्रम नोंदवला. त्या दिवशी २४ तासांदरम्यान एकूण २०१ प्रवाशी गाड्या धावल्या आणि त्या सर्व ट्रेन वेळेत पोहचल्या. म्हणजेच तब्बल २०१ गाड्या वेळेपत्रकानुसार ठरलेल्या वेळेत स्थानकावर पोहचल्या. १६७ वर्षात पहिल्यांदाच हा प्रकार घडून आला.