मोठी बातमी ! कोविड-19 महामारीनंतर सुद्धा AC कोचमध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार नाही ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डचे चेयरमन विनोद कुमार यादव यांनी शनिवारी सांगितले की, एसी कोचमध्ये प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांना कोविड-19 महामारी नंतरही आपल्या चादर आणि बेडशीटसोबत प्रवास करावा लागेल. आम्ही प्रवाशांना सिंगल यूजवाली बेडशीट देण्याचा निर्णय घेतला आहे किंवा महामारी थांबल्यानंतर सुद्धा प्रवाशी आपलीच चादर आणि बेडशीट आणू शकतात. यासाठी एक विस्तृत धोरण बनवण्यात आले आहे आणि एक निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरताच मार्चमध्ये रेल्वेने एसी कोचमध्ये लावलेले पडदे हटवले होते. त्यानंतर प्रवाशांना देण्यात येणारा बेडरोल हटवला होता. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. लॉकडाऊंन झाल्यानंतर 23 मार्च ते 20 मेपर्यंत रेल्वे गाड्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या.

500 ट्रेनची सेवा होणार नाही बंद
व्ही. के. यादव यांनी म्हटले की, रेल्वे प्रवासादरम्यान स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे सुमारे 500 ट्रेनची सेवा बंद करणार असल्याबाबत ते म्हणाले, कोणत्याही ट्रेनची सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही आणि कोणतेही स्टेशन बंद होणार नाही.

झीरो-आधारित टाइम टेबल होत आहे तयार
ते म्हणाले, आम्ही झीरो-आधारित टाइम टेबल तयार करत आहोत आणि यामध्ये आयआयटी मुंबईची मदत घेत आहोत. हे सुद्धा शक्य आहे की, काही नव्या ट्रेन सुरू केल्या जातील किंवा सध्याच्या ट्रेनची नावे बदलली जातील किंवा त्या रिशेड्यूल केल्या जातील. झीरो बेस्ड टाइम टेबल आणण्याचा उद्देश प्रवाशांना शक्य तेवढ्या सुविधा देण्याचा आहे. प्रवाशांना गर्दीमुक्त करायचे आहे.