रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! राजधानी, शताब्दीसह आगामी काही दिवसात रेल्वेकडून 40 स्पेशल ट्रेन, इथं पाहा संपुर्ण यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने सणांचा कालावधी लक्षात घेऊन काही जादा स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उत्तर रेल्वेने आणखी 40 स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये राजधानी, दुरंतो आणि शताब्दी सारख्या ट्रेनसुद्धा असतील. उत्तर रेल्वेचे प्रवक्ता दीपक कुमार यांनी म्हटले की, हजरत निजामुद्दीन-पुणे एसी दुरंतो एक्सप्रेस स्पेशल, नवी दिल्ली-कालका शताब्दी एक्सप्रेस स्पेशल, नवी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेस स्पेशल आणि श्री माता वेष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली एक्सप्रेस स्पेशल 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येतील.

माहितीनुसार, उत्तर रेल्वे 16 ऑक्टोबरपासून बांद्रा टर्मिनस-हजरत निजामुद्दीन युवा एक्सप्रेस स्पेशल आणि 17 ऑक्टोबरपासून हजरत निजामुद्दीन-बांद्रा टर्मिनस युवा एक्सप्रेस स्पेशलची सेवा सुद्धा सुरू करणार आहे. नव्या ट्रेनची पूर्ण लिस्ट तुम्ही येथे चेक करू शकता.

12 ऑक्टोबरपासून 15 ऑक्टोबर दरम्यान गाड्या
02505 – दिब्रूगड-नवी दिल्ली राजधानी विशेष- 12 ऑक्टोबर
05159 – छपरा-दुर्ग विशेष- 13 ऑक्टोबर
05160 – दुर्ग-छपरा विशेष – 13 ऑक्टोबर
02264 – हजरत निजामुद्दीन-पुणे एसी दुरंतो एक्सप्रेस विशेष – 15 ऑक्टोबर
02461 – श्री माता वैष्णो देवी कटरा – नवी दिल्ली एसी एक्सप्रेस स्पेशल – 15 ऑक्टोबर
02017 – नवी दिल्ली – देहरादून शताब्दी विशेष – 15 ऑक्टोबर
02018 – देहरादून – नवी दिल्ली शताब्दी विशेष – 15 ऑक्टोबर
02011 – नवी दिल्ली-कालका शताब्दी विशेष – 15 ऑक्टोबर
02012 – कालका – नवी दिल्ली शताब्दी विशेष – 15 ऑक्टोबर
02171 – लोकमान्य टिळक-हरिद्वार एसी एक्स्प्रेस विशेष – 15 ऑक्टोबर
02506 – नवी दिल्ली-दिब्रूगड राजधानी विशेष – 15 ऑक्टोबर
02503 – दिब्रुगड – नवीन दिल्ली राजधानी विशेष – 15 ऑक्टोबर
09305 – डॉ. आंबेडकर नगर – कामाख्या विशेष – 15 ऑक्टोबर

16 – ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या गाड्या
02263 – पुणे – हजरत निजामुद्दीन एसी दुरंतो एक्सप्रेस विशेष – 16 ऑक्टोबरपासून
02461 – नवी दिल्ली – श्री माता वैष्णो देवी कटरा एसी एक्स्प्रेस विशेष – 16 ऑक्टोबर
02029 – नवी दिल्ली -अमृतसर शताब्दी एक्सप्रेस विशेष – 16 ऑक्टोबर
02030 – अमृतसर – नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस विशेष – 16 ऑक्टोबर
02493- हजरत निजामुद्दीन-पुणे एसी स्पेशल – 16 ऑक्टोबर
09047 – वांद्रे टर्मिनस – हजरत निजामुद्दीन युवा एक्सप्रेस विशेष – 16 ऑक्टोबर
02172 – हरिद्वार-लोकमान्य टिळक एसी एक्स्प्रेस विशेष – 16 ऑक्टोबर

17 ऑक्टोबरपासून 18 ऑक्टोबर दरम्यान गाड्या
09048 – हजरत निजामुद्दीन – वांद्रे टर्मिनस युवा एक्सप्रेस विशेष – 17 ऑक्टोबर
02121 – लोकमान्य टिळक-लखनऊ एसी एक्स्प्रेस विशेष – 17 ऑक्टोबर
02025 – नागपूर-अमृतसर एसी एक्स्प्रेस विशेष – 17 ऑक्टोबर
09063 – उधना-दानापूर स्पेशल- 17 ऑक्टोबर
09021 – वांद्रे टर्मिनस – लखनऊ विशेष – 17 ऑक्टोबर
02813 – भुवनेश्वर-आनंद विहार टर्मिनल दुरंतो स्पेशल – 17 ऑक्टोबर
02494 – पुणे-हजरत निजामुद्दीन एसी स्पेशल – 18 ऑक्टोबर
09022 – लखनऊ – वांद्रे टर्मिनस विशेष – 18 ऑक्टोबर
09306 – कामाख्या-डॉ. आंबेडकर नगर विशेष – 18 ऑक्टोबर
09064 – दानापूर-उधना विशेष – 18 ऑक्टोबर

19 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबर दरम्यान गाड्या
02122 – लखनऊ-लोकमान्य टिळक एसी एक्स्प्रेस विशेष – 19 ऑक्टोबर
02814 – आनंद विहार टर्मिनल-भुवनेश्वर दुरंतो स्पेशल – 19 ऑक्टोबर
02026 – अमृतसर – नागपूर एसी एक्सप्रेस स्पेशल – 19 ऑक्टोबर
02504 – नवी दिल्ली -दिब्रूगड राजधानी विशेष – 20 ऑक्टोबर
09111 – वलसाड-हरिद्वार स्पेशल – 20 ऑक्टोबर
09103 – वडोदरा-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल – 21 ऑक्टोबर
02209 – भुवनेश्वर – नवी दिल्ली दुरंतो स्पेशल – 21 ऑक्टोबर
09112 – हरिद्वार-वलसाड स्पेशल – 21 ऑक्टोबर
02210 – नवी दिल्ली – भुवनेश्वर दुरंतो विशेष – 22 ऑक्टोबर
09104 – वाराणसी-वडोदरा सुपरफास्ट स्पेशल – 23 ऑक्टोबर