खुशखबर ! फ्रीमध्ये करू शकता रेल्वे प्रवास, जाणून घ्या नियम आणि कसे मिळू शकतात फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सतत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता रेल्वे तिकिटांवर तुम्हाला मिळू शकते मोठी सूट. एवढेच काय पण रेल्वेने फ्रीमध्ये सुद्धा प्रवास करता येऊ शकतो. रेल्वे प्रशासनाकडून काही खास वर्गवारीतील लोकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी IRCTC च्या मार्फत रेल्वे तिकिटांवरती सूट दिली जाणार आहे. बेरोजगार तरुणांना रेल्वेच्या तिकिटांवरती 50 ते 100 % सूट दिली जाते.

या यादीमध्ये विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना जर घरापासून शाळा लांब असेल तर प्रवासासाठी, परदेशी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी, शोध कार्यासाठीचा प्रवास अशा अनेक कारणांसाठी रेल्वेने प्रवास करताना सूट मिळते. त्याचप्रमाणे 58 वर्षांची महिला आणि 60 वर्षांच्या पुरुषांना सुद्धा ट्रेनच्या तिकिटांमध्ये सूट दिली जाते. जाणून घेऊयात कोणाला किती सूट रेल्वेच्या प्रवासासाठी उपलब्ध आहे.

जी हां, भारतीय रेलवे इन लोगों को भी सस्‍ते में सफर कराता है. बेरोजगार युवाओं की टिकट पर 50 से 100 फीसदी तक का डिस्‍काउंट रहता है.

जेष्ठ नागरिकांना मिळणार मोठी सूट –
58 वर्ष किंवा त्या पेक्षा अधिक वयाच्या महिलांना आणि 60 वर्षांपेक्षा अधीक वयाच्या पुरुषांना रेल्वेकडून प्रवासासाठी सूट दिली जाणार आहे. महिला प्रवाशांना 50 % आणि पुरुष प्रवाशांना 40 % सूट दिली जाणार आहे.

ही सूट प्रवाश्यांना सगळ्याच वर्गात प्रवास करण्यासाठी मिळणार आहे. राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करतानादेखील सूट दिली जाणार आहे आणि प्रवासी कोणत्या हेतूने प्रवास करत आहे याची विचारणा देखील यामध्ये केली जाणार नाही.

विद्यार्थ्यांना मिळणारी सूट –
रेल्वे प्रशासन मुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत MST ने सेकंड क्लासमध्ये फ्री प्रवास करून देत आहे. तसेच 12 वी पर्यंतच्या मुलांना MST च्या सेकंड क्लासने फ्री मध्ये प्रवास करता येतो. यामध्ये मदरसामधील विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.

फ्री में कर सकते हैं Rail में सफर, जानिए क्या है नियम और कैसे मिल सकता है आपको फायदा

केंद्र वा राज्य सरकारच्या नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जाणाऱ्या बेरोजगार तरुणांना स्लीपर क्लासच्या तिकिटामध्ये 50 % आणि सेकंड क्लासच्या तिकिटांमध्ये 100 % सूट दिली जात आहे.

तरुणांना मिळणारी सूट –
– राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमानुसार जाणाऱ्या लोकांना सेकंड आणि स्लीपर क्लासने प्रवास करण्यासाठी 50 % सूट मिळते.

– राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमानुसार उत्थान सेवा समितिमध्ये जाणाऱ्या लोकांना सेकंड आणि स्लीपर क्लासने प्रवास करण्यासाठी 40 % सूट मिळते.

– बेरोजगार तरुणांना महानगरमपालिका, सरकारी विद्यापीठे अशा अनेक सरकारी जागांवर मुलाखतीसाठी जाताना सेकंड आणि स्लीपर क्लासने प्रवास करण्यासाठी 50 % सूट मिळते.

– केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाणाऱ्यांना सेकंड क्लासमध्ये 100 % आणि स्लीपर क्लास मध्ये 50 % सूट मिळते.

Visit : Policenama.com