खुशखबर ! आता रेल्वे स्टेशनवर मिळणार ‘एकदम’ फ्री मोबाइल कॉलिंगसह ‘या’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या प्रवाशांच्या सोयी करीता भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकात एक अनोखी ह्यूमन इंटरएक्टिव इंटरफेस सिस्टम (मानवी संवाद साधणारी यंत्रणा) बसविली आहे. याद्वारे प्रवासी मोबाइल व व्हिडीओ कॉलिंग विनामूल्य करू शकतात. तसेच, आपण फास्ट मोबाइल चार्जिंग, हवामान आणि ट्रेनसह स्थानिक ठिकाणांबद्दल माहिती देखील मिळवू शकता. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विशाखापट्टणम रेल्वे स्थानकात पहिला गेमिंग झोनदेखील सुरू झाला होता. रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणारा हा पहिलाच उपक्रम आहे. प्रवासी गेमिंग झोनमध्ये आधुनिक गेमिंगचा आनंद घेऊ शकतात.

सर्वकाही एका क्लिक वर
भारतीय रेल्वे नेटवर्कमधील हा पहिला डिजिटल कियोस्क आहे. हे भुवनेश्वर येथील नेक्साइट इन्फोटेक सर्व्हिस लिमिटेडने विकसित केले आहे. हा किओस्क मानवी इंटरफेस सिस्टमवर आधारित आहे. याद्वारे, विनामूल्य मोबाइल आणि व्हिडिओ कॉलिंग व्यतिरिक्त, डिजिटल कियॉक्समध्ये मोबाइल आणि लॅपटॉपचे 6 फास्ट चार्जिंग पोर्ट आणि 10 इंचाचा इंटरॅक्टिव्ह टच स्क्रीन देण्यात आला आहे.या डिजिटल स्क्रीनवर हवामानाची माहिती, गाड्या, स्थानिक निसर्गरम्य ठिकाणांची माहिती, गुगल नकाशे व शहर नकाशेही उपलब्ध असतील.

सुरुवात विशाखापट्टणम स्थानकापासून
रेल्वेने प्रथम विशाखापट्टणम स्थानकात ही मानवी संवादात्मक इंटरफेस प्रणाली स्थापित केली आहे. पूर्व डिजिटल कोस्ट रेल्वे विभागातील विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवर हा डिजिटल किओस्क स्थापित केला आहे. हा डिजिटल किओस्क नॉन-फेअर रेव्हेन्यू सिस्टम अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने विकसित केला आहे. डिजिटल किओस्कच्या एलईडी स्क्रीनवर जाहिराती दर्शवूनही महसूल मिळविला जाईल. फ्री कॉलिंगच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशनवर डिजिटल कियोस्क आणि डिजिटल बिलबोर्ड बसविण्यात आले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/