Indian Railways | पुढील 7 दिवसापर्यंत 6 तासांसाठी तिकिट बुकिंग-रिझर्व्हेशन संबंधी सेवांमध्ये ‘व्यत्यय’ येणार, रेल्वेनं सांगितलं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Indian Railways | रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) पॅसेंजर्स रिझर्व्हेशन सिस्टमसंबंधी सूचना जारी केली आहे. मंत्रालयाने माहिती दिली आहे की, 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे एक आठवड्यासाठी तिकीट बुकिंग आणि रिझर्व्हेशनसंबंधी सर्व सेवा ‘बाधित’ (सेवांमध्ये ‘व्यत्यय’ येणार) राहतील. (Indian Railways )

 

वक्तव्यानुसार, हे पाऊल प्रवासी सेवा सामान्य करणे आणि कोविड पूर्व स्तरावर टप्प्याटप्पयाने परतण्याच्या उद्देशाने रेल्वेने उचलले आहे
(Passenger Reservation Service will be closed for 6 hours at night for the next 7 days to return pre-covid normal situation).

 

या वेळेत बंद राहील सेवा

 

रेल्वे मंत्रालयाने रविवारी माहिती दिली की, प्रवाशांसंबंधी सेवा सामान्य करण्यासाठी पॅसेंजर्स रिझर्व्हेशन सर्व्हिस
(Passenger Reservation System) पुढील 7 दिवसांपर्यंत रात्रीच्या वेळी 6 तासांसाठी बंद राहील. (Indian Railways)

 

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, 11:30 वाजल्यापासून सकाळी 5:30 वाजेपर्यंत या 6 तासाच्या कालावधी दरम्यान कोणतीही PRS सर्व्हिस (Passenger Reservation System) उपलब्ध होणार नाही.

 

पीआरएस, इन्क्वायरी विनाअडथळा सुरू

 

मंत्रालयाने माहिती दिली की, पॅसेंजर रिझर्व्हेशन सर्व्हिस जसे- तिकीट रिझर्व्हेशन, वर्तमान बुकिंग, तिकीट कॅन्सलेशन,
इन्क्वायरी सर्व्हिस इत्यादी यासंबंधी कोणतीही सेवा प्रवाशांना 6 तासापर्यंत मिळणार नाही आणि हा प्रभाव एक आठवड्यापर्यंत म्हणजे 21 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. (Indian Railways)

 

मात्र पीआरएस सर्व्हिसशिवाय इतर सर्व इन्क्वायरी सर्व्हिस विनाअडथळा सुरू राहतील.

 

सर्व ट्रेनवरून हटवला स्पेशल टॅग

 

रेल्वे आता कोरोना संसर्गाच्या अगोदरच्या स्थितीत परतत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने सर्व ट्रेनवरील स्पेशल स्टेटस बंद केले आहे.
आता ट्रेनचे संचालन जुन्या क्रमांकांनी आणि जुन्या प्रवासभाड्यावर केले जाईल.
आता स्पेशल ट्रेनच्या नंबरमधून ‘0’ हटवला जाईल आणि सर्व ट्रेन प्री-कोविड ट्रेनप्रमाणे त्याच नंबरवर चालतील.

 

तात्काळ प्रभावाने आदेश जारी

 

रेल्वेचे भाडेसुद्धा जे कोविडपूर्वी होते तेच लागू होईल. कोरोना काळात रेल्वेने स्पेशल ट्रेनच्या नावाने जास्त प्रवासभाडे वसुली चालवली होती.
रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनसाठी स्पेशन टॅग हटवणे तसेच महामारीपूर्वीच्या प्रवास भाड्यावर तात्काळ प्रभावाने परतण्याचा आदेश शुक्रवारी जारी केला.

 

Web Title : Indian Railways | passenger reservation services ticket booking disrupted in train for six hours for next 7 days ministry of railways given reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Punjab Assembly Election | अभिनेता सोनू सूदची बहीण पंजाब विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

Sukanya Samriddhi Yojana | सरकारच्या ‘या’ स्कीम अंतर्गत तुमच्या मुलीला मिळतील पूर्ण 15 लाख रुपये, विवाह किंवा शिक्षण कुठेही करू शकता वापर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर