पूर्वोत्तर रेल्वेने केली पूजा स्पेशल ट्रेनची घोषणा, टाइम टेबल जारी, पहा संपूर्ण शेड्यूल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने सणांसाठी अनेक स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. या स्पेशल ट्रेनपैकी काही पूजा स्पेशल ट्रेन तर काही फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन नावाने चालवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्वोत्तर रेल्वेने सुद्धा पूजा स्पेशल ट्रेनची लिस्ट जारी केली आहे. ज्यामध्ये टाइम टेबल आणि पूर्ण शेड्यूलची माहिती दिली आहे.

रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, या पूजा स्पेशल ट्रेनमध्ये गोरखपुर-जम्मूतवी, मंडुवाडीह-नवी दिल्ली, दिल्ली-छपरा आणि छपरा- छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या दरम्यान चालणार्‍या ट्रेनचा समावेश आहे.

ट्रेन क्रमांक 02587/02588 गोरखपुर आणि जम्मू तवीच्या दरम्यान चालतील. याची सुरूवात 26 ऑक्टोबरला गोरखपुरहून होईल. ही साप्ताहिक ट्रेन केवळ सोमवारी चालेल. तर परतीला ही शनिवारी धावेल.

मंडुवाडीह – नवी दिल्ली सुपरफास्ट
ट्रेन नंबर 02581 मंडुवाडीह-नवी दिल्ली सुपरफास्ट 20 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज मंडुवाडीहहून रात्री 10:30 वाजता धावेल. जी ज्ञानपुर रोड, प्रयागराज, कानपुर सेंट्रल, गाझियाबादहून दुसर्‍या दिवशी दुपारी 12.15 वाजता दिल्लीला पोहचेल.

अशाच प्रकारे परतीला ट्रेन नंबर 02582 नवी दिल्ली-मंडुवाडीह सुपरफास्ट 20 ऑक्टोबरला चालेल. ही दररोज नवी दिल्लीहून रात्री 10:35 वाजता सुटून सकाळी 11.10 वाजता मंडुवाडीह येथे पोहचेल. ट्रेनमध्ये साधारण द्वितीय श्रेणीचे 04, शयनयान श्रेणीचे 09, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचा 01, वातानुकूलित प्रथमसह द्वितीय श्रेणीचा 01 तसेच वातानुकूलित तृतीय श्रेणीचे पाच कोच आहे.

मंडुआडीह – नवी दिल्ली पूजा स्पेशल
छपरा आणि नवी दिल्लीच्या दरम्यान पूजा स्पेशल एक्स्प्रेस 05115/05116 साप्ताहिक चालेल जी 20 ऑक्टोबरपासून सुरू होईल. छपराहून शनिवारला आणि नवी दिल्लीहून रविवारी धावेल. ही ट्रेन छपराहून सकाळी 11:15 ला सुटेल आणि पुढील दिवशी दुपारी 11:20 वर पोहचेल. प्रवासादरम्यान ही गाडी बलिया, गाझीपुर सिटी, जौनपुर, फैजाबाद, लखनऊ, मुरादाबाद, गाझियाबाद इत्यादी स्टेशनांवर थांबेल.

छपरा दिल्ली जंक्शन पूजा स्पेशल
छपराहून निघून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणारी ट्रेन नंबर 05101/05102, 20 ऑक्टोबरपासून सुरू होईल. ही ट्रेन छपराहून केवळ मंगळवारी धावेल, तर परतीला ही शुक्रवारी धावेल. ही ट्रेन छपराहून रात्री 9:15 ला सुटून सुमारे 30 तासांचा प्रवास करून सकाळी 6:15 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर पोहचेल. पूर्वोत्तर रेल्वेकडून सुरू करण्यात येत असलेल्या सर्व ट्रेनपैकी ही सर्वात लांबच्या पल्ल्याची ट्रेन असेल.

20 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबंरपर्यंत 392 फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन
इंडियन रेल्वेने सणांच्या कालावधीसाठी 196 जोडी म्हणजे 392 स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन म्हणून चालवण्यात येतील. दुर्गा पूजा, दसरा, दिवाळी आणि छठ पूजेच्या दरम्यान सुट्ट्यांमुळे प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोलकाता, पाटणा, वाराणसी, लखनऊसह अन्य ठिकाणांसाठी विशेष ट्रेन चालवल्या जातील. या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन 20 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंतच चालतील.