प्रवाशांनी कृपया लक्ष द्या ! बदलला Indian Railways चा टोल फ्री हेल्पलाईन नंबर, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : आता रेल्वेशी संबंधीत कोणतीही तक्रार करताना संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही. रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व रेल्वे हेल्पलाईन नंबरऐवजी एकच नंबर जारी केला आहे. भारतीय रेल्वेने सध्याच्या सर्व हेल्पलाईन नंबर्सऐवजी आता एकच 139 नंबर जारी केला आहे. ज्यामुळे प्रवाशांना हा नंबर लक्षात ठेवणे आणि संपर्क साधणे सोपे झाले आहे. एकल नंबर 139 चा वापर प्रवासाच्या दरम्यान सर्व चौकशी आणि तक्रारी नोंदवण्यासाठी केला जाईल.

रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे की, झोनल रेल्वे 139 च्याशिवाय सुद्धा नवा हेल्पलाईन नंबर किंवा तक्रार नंबर जारी करणार नाही. नवा नंबर रेल्वेचा वापर करणार्‍यांना एकत्रित सेवा प्रदान करेल, जो सुरक्षा, तक्रार, खाद्यसेवा आणि सतर्कतेसाठी केवळ 139 डायल करू शकता. नव्या नंबरच्या सुरुवातीसह, इतर सर्व हेल्पलाईन नंबर बंद करण्यात आले आहेत.

139 नंबर विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि तो आयव्हीआरएस (इंटरअ‍ॅक्टिव्ह वॉईस रिस्पॉन्स सिस्टम) वर आधारित आहे. सर्व मोबाइल फोन वापरकर्ते 139 वर कॉल करू शकतात. या नंबरवर प्रवासी, ट्रेनशी संबंधित मुलभूत चौकशी आणि पीएनआर स्थिती, तिकिट (सामान्य आणि तत्काळ) उपलब्धता, ट्रेनचे आगमन, प्रस्थान, आरक्षणा संबंधी चौकशीसाठी एक एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात.

रद्द शेड्यूल, सीट उपलब्धता, तिकिट रद्द करणे, भाडे, उतरण्याची सूचना, वेकअप कॉल; ऑन-बोर्ड सेवा आणि सुरक्षासंबंधी माहिती सुद्धा याद्वारे मिळू शकते.