रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! सणासुदीच्या काळात रेल्वेकडून आणखी 200 ट्रेन

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सण-उत्सवामध्ये गावी जाण्यासाठी रेल्वेप्रशासनांनी 200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती गुरुवारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव यांनी सांगितली.

यादव म्हणाले की, सण-उत्सवांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय रेल्वे प्रशासन 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या सण-उत्सवाच्या काळात 200 विशेष गाड्या चालवण्याचा विचार करीत आहे. आणि गरज भासल्यास किंवा जास्त मागणी असल्यास अजून काही विशेष गाड्या सोडल्या जाऊ शकतात.

यादव म्हणाले की, तशा आम्ही १२ सप्टेंबरपासून अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. तसेच आम्ही विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली असून त्यांनी स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या स्थितीचा आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे आणि सणासुदीच्या कालावधीत किती विशेष गाड्या चालवल्या जातील यावर निर्णय घेण्यात येईल.

राज्य शासनाच्या गरजा परिस्थितीचा विचार करता रेल्वेने प्रवासी सुविधांचा आढावा घेतला आहे. यादव म्हणाले की, जोपर्यंत प्रवासी गाड्यांचा प्रश्न आहे, आम्ही रोजची गाड्यांची गरज आणि कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊ. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे गाड्या सोडण्यात येतील.

त्यांनी सांगितले की सणासुदीच्या काळात प्रत्येक व्यस्त मार्गावर एक ते दोन क्लोन गाड्या चालवल्या जातील. याशिवाय सणासुदीच्या म्हणजेच दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस ट्रॅकवर धावू शकते. आयआरसीटीसीने 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यास परवानगी मागितली आहे
त्यामुळे कोरोनाच्या या काळात प्रवाशांची काळजी कशी घेतली जाईल या बद्दल सुद्धा आम्ही काम करत आहोत.