Indian Railways | तुमचा रेल्वे प्रवासाचा प्लान अचानक बदललाय? तर ‘नो-टेन्शन’, ‘या’ पद्धतीने तिकीट रद्द न करता करा प्रवास, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Indian Railways | अनेक वेळा तुमचा रेल्वे प्रवासाचा प्लान ठरतो अर्थात तारीख, वार, वेळ. त्यावेळी तुम्ही तिकीट बुकींग देखील करता. परंतु, काही कारणास्तव या प्लानमध्ये बदल देखील होतात. या बदलामुळे तिकीट रद्द करण्याची वेळ येतेय. अनेक वेळा काही प्रवासी रेल्वेचे तिकीट रद्द करून दुसरे तिकीट बूक करत असतात. यात तुमचे पैसे देखील कट केले जाते. मात्र, पहिलं तिकीट रद्द न करता तुम्हाला दुसरं तिकीट बूक करता येऊ शकतं. हे तुम्हाला माहीत आहे का? ही एक रेल्वेचेच नियम (Indian Railways) आणि सुविधा आहे. याबाबत जाणून घ्या.

तुमच्या प्रवासाचा प्लान बदलला तर तुम्हाला रेल्वे प्रवासाची (Indian Railway) तारीख आणि वेळ देखील रेल्वेच्या उपलब्धतेनुसार आणि तुमच्या सुविधेनुसार बदलण्याची सोय उपलब्ध आहे.
म्हणून , तुम्हाला तुमचा प्रवास पूर्वनियोजित ‘किंवा’ पुढे ढकलले (‘Prepond ‘or’ Postpond)’ करता येऊ शकतो. असं रेल्वेच्या नियमानुसार सांगितलं आहे.
तसेच, भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) प्रवाशांना आपलं कन्फर्म, आरएसी किंवा वेटिंग (RAC or Waiting) तिकीटाच्या प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधाही दिली जाते.
रेल्वेच्या नियमांनुसार, या तिकीटांवर प्रवासाची तारीख निर्धारित शुल्क भरल्यानंतर त्याच श्रेणीत अथवा उच्च श्रेणीत किंवा ठरलेल्या स्थानापर्यंत Prepond ‘or’ Postpond केली जाऊ शकते.

दरम्यान, रेल्वे प्रवाशांना आपल्या प्रवासाचा विस्तार करण्याचा, बोर्डिंग स्टेशन (Boarding station) बदलण्याचा किंवा आपलं तिकीट उच्च श्रेणीत अपग्रेड करण्याची सुविधा मिळते.
यातील काही सुविधा केवळ ऑफलाईन (Offline) तिकीटांसाठी लागू आहेत.
मात्र इतर सुविधा ऑफलाईन आणि ऑनालाईन (Offline and online) दोन्ही स्वरुपातील तिकीटांसाठी उपलब्ध आहेत.

अशी मिळेल तारीख बदलून?

मूळ बोर्डिंग स्टेशनच्या स्टेशन मॅनेजरला (Station Manager) लिखित स्वरुपात अर्ज देऊन रेल्वे सुटण्या आधी कमीत कमी २४ तासापुर्वी कोणत्याही कम्प्युटराईज्ड रिझर्व्हेशन सेंटरवर जाऊन प्रवासी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करू शकतात.
ही सुविधा ऑफलाईन तर उपलब्ध आहेच मात्र, ऑनलाईन बुकिंगमध्ये देखील तुम्हाला हा पर्याय उपलब्ध असणार आहे.

 

प्रवास वाढवायचा असेल तर काय कराल?

समजा प्रवाशाला प्रवास आणखी वाढवायचा असेल म्हणजेच ज्या स्टेशनपर्यंत बुकींग केलेलं आहे.
त्याच्या पुढच्या काही स्टेशनपर्यंत जायचं असेल तरी देखील रेल्वेकडून ही सुविधा मिळते.
यासाठी प्रवाशांना बुक केलेला प्रवास पूर्ण होण्यापूर्वी तिकीट चेंकिंग स्टाफशी संपर्क साधावा लागणार आहे.

रेल्वे स्टेशन काऊंटरवर बुक करण्यात आलेल्या तिकीटाच्या तारीख अधिकाधिक एक वेळा बदल करण्यात येऊ शकतो.
मग जागेची उपलब्धता खा‍त्री असो किंवा RAC or Waiting असो, प्रवासाची तारीख पुढे
ढकलण्यासाठी अथवा निश्चित दिवसा पूर्वी प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आरक्षण कार्यालयात
जाऊन रेल्वे सुटण्या अगोदर ४८ तासापूर्वी आपलं तिकीट स्वाधीन करावं लागेल.
ही सुविधा फक्त ऑफलाईन तिकीटांसाठी उपलब्ध आहे.
ऑनलाईन बूक (Book online) करण्यात आलेल्या तिकीटांवर ही सुविधा उपलब्ध नाही.

 

Web Title : indian railways reservation rules how to change journey date upgrade to higher class and more irctc news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rupee against Dollar | भारतीय चलनामध्ये लागोपाठ चौथ्या दिवशी जबरदस्त ‘उसळी’, डॉलरच्या तुलनेत 29 पैशांची वाढ; 4 सत्रात 124 पैशांची ‘तेजी’

Fake Milk Test | तुम्ही भेसळयुक्त दूध, तूप किंवा पनीर खरेदी करत आहात का?, एक मिनिटात ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या

Pune Corporation | पुण्याच्या नाना पेठेतील डिप्रेस्ड क्लासेस मिशनला 90 वर्षे कराराने जागा देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर