Indian Railways : आजपासून बदलले का 13000 ट्रेनचे टाइम टेबल ? रेल्वेने दिली नवी माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन रेल्वेच्या गाड्यांचे टाइम टेबल बदलल्याबाबत बातमी होती की, 1 नोव्हेंबर 2020 पासून 13000 ट्रेनचे टाइम टेबल बदलले जाणार आहे. रेल्वेकडून या बातमीबाबत एक वक्तव्य जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये विभागाने म्हटले आहे की, ही बातमी पूर्णपणे निराधार आणि संभ्रम पसरवणारी आहे. विभागाकडून कोणत्याही ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात येणार नाही. देशभरात पसरलेल्या कोरोना संकटामुळे ट्रेनचे नियमित संचालन सध्या होत नाही, सध्या प्रवाशांची सुविधा पहाता काही ट्रेनचे संचालन रेल्वे करत आहे.

रेल्वेने जारी केले वक्तव्य
रेल्वेनुसार, मार्चच्या अंतिम आठवड्यात झालेल्या लॉकडाऊननंतर नियमित ट्रेनचे संचालन केले जात नाही. सध्या 702 स्पेशल ट्रेन आणि 450 फेस्टिव्हल ट्रेन चालवल्या जात आहेत. याशिवाय मुंबई आणि कोलकाता क्षेत्रात काही उपनगरीय गाड्या सुद्धा चालवल्या जात आहेत.

यासोबतच विभागाने म्हटले आहे की, पुढील आदेशापर्यंत भारतीय रेल्वे स्पेशल ट्रेन चालवत राहाणार आहे. स्पेशल ट्रेनच्या मागणीचा रेल्वे बोर्ड सतत आढावा घेत आहे. या सर्व स्पेशल ट्रेन प्रवाशांची गरज आणि सुविधा लक्षात घेऊन चालवल्या जात आहेत.

अशी बातमी होती की गाड्यांचे टायमिंग 15 मिनिटांपासून 2 तासापर्यंत बदलले जाणार आहे. यूपी-बिहारहून जाणार्‍या काही पूजा स्पेशल गाड्यांच्या वेळेत जरूर बदल होत आहे. काही जुन्या ट्रेन सुपर फास्टमध्ये बदलल्या जात आहेत. सध्या रेल्वेने ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले आहे.

प्रत्येकवर्षी जुलैमध्ये बदलतो टायमिंग
रेल्वे दरवर्षी 1 जुलैपासून गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करते. यावर्षी कोरोनामुळे जुलैमध्ये गाड्यांचे रूटीन संचालन नव्हते. आता सामान्य गाड्यांचे संचालन ठप्प आहे. केवळ स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत. याच कारणामुळे हा बदल वाढवून नोव्हेंबरमध्ये लागू करण्याची घोषणा केली गेली होती.