उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे करणार सिनेमाच्या प्रमोशनचा ‘धंदा’, ‘खिलाडी’ अक्षयच्या ‘हाऊसफुल 4’ पासून सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी एक खास योजना सुरु केली आहे. या योजनेत ‘प्रमोशन ऑन व्हील्स’ करण्यात येणार आहे. या अंतर्गत स्पेशल रेल्वे बुकिंग करण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वे आता प्रमोशनल एक्टिविटीजसाठी रेल्वे बुकिंग करण्यात येईल. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रमोशन ऑन व्हील्स अंतर्गत जाहिरातीसंबंधित एक्टीविटीज आणि कला संस्कृती, सिनेमे, टेलिव्हिजन कार्यक्रम, खेल इत्यादीच्या प्रचारासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात येतील. बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार यांचा नवा सिनेमा हाऊसफुल 4 च्या प्रमोशनसाठी रेल्वे बुक केली आहे.

काय आहे नवा प्लॅन –
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांच्यानुसार रेल्वे अनेक राज्यातून तसेच सुरत, वडोदरा आणि कोटा सारख्या महत्वपूर्ण जिल्ह्यातून मार्गक्रमण करेल.
रेल्वेकडून सांगण्यात आले की, या अंतर्गत रेल्वेने अनेक प्रोडक्शन हाऊसबरोबर संपर्क साधाला आहे, ज्याचे नवे सिनेमे येणार आहेत.
रेल्वेने देशभरात प्रचार करण्यासाठी एफटीआर रेल्वेचा वापर करण्याची ऑफर दिली आहे. या रेल्वेच्या संचालनालयाची जबाबदारी आयआरसीटीसीकडे आहे.

अक्षय कुमारने केली रेल्वे बूक –
अक्षय कुमारने आपल्या ‘हाऊसफुल 4’ सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी एक रेल्वे बुक केली आहे. आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेद्वारे संचलित पहिली विशेष रेल्वे प्रमोशन ऑन व्हील्स रेल्वे हाउसफुल 4 च्या टीमबरोबर समन्वय साधून दिग्गजांबरोबर तसेच मिडिया कर्मचाऱ्यांबरोबर बुधवारी मुंबई सेंट्रलपासून रवाना होईल आणि गुरुवारी नवी दिल्ली पोहचेल. या रेल्वेमध्ये 8 डब्बे आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी