खुशखबर ! रेल्वेकडून नवरात्रीपुर्वी सोडणार 78 स्पेशल ट्रेन, ‘इथं’ पाहा संपुर्ण यादी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे बोर्डाने 78 विशेष गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी रेल्वे वेगवेगळ्या झोनमध्ये सोयीनुसार, 39 जोड्या गाड्या चालवणार आहे. यापैकी बहुतांश गाड्या एसी स्पेशल, राजधानी, शताब्दी आणि दुरंतो श्रेणीच्या असतील. चला तर मग जाणून घेऊया या गाड्यांविषयी सर्व काही..

तेजस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी त्याचबरोबर कोरोनातून आपला बचाव करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य सेतु अ‍ॅपशिवाय प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या गाड्या विशेष गाड्या म्हणून चालवल्या जातील, असे रेल्वे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. मात्र या गाड्या कधी धावतील हे सांगण्यात आले नाही. लवकरात लवकर सोयीस्कर तारखेला त्या सुरू केल्या जातील, असं रेल्वेने म्हटलं आहे.
 ये है चलने वाली ट्रेनों की लिस्ट
 एयर कंडीशन ट्रेनों की लिस्ट

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे मंडळाने इतर विशेष 78 गाड्या चालविण्यास परवानगी दिली आहे. ज्या गाड्यांवर प्रवाशांचा जास्त दबाव आहे अशा मार्गांसाठी या गाड्या निवडल्या गेल्या आहेत. झोन स्तरावर गाड्या सुरू होण्याची तारीख जाहीर केली जाईल. पण तेजसचे संचालन 17 ऑक्टोबरपासून नवरात्रीच्या प्रारंभासोबत सुरू होतील.

कोविड -19 मुळे उत्तराखंड आणि महाराष्ट्रात विविध निर्बंधांमुळे या राज्यांसाठी रेल्वेगाड्यांची संख्या फारच मर्यादित होती. या विशेष गाड्यांच्या खेपामध्ये हरिद्वार ते देहरादून ते मुंबई दरम्यानच्या गाड्या चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अलीकडेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव म्हणाले की, कोरोना साथीच्या दृष्टीने केवळ राज्यांच्या संमतीनेच गाड्यांची संख्या वाढवता येऊ शकते. परंतु आता पूर्णपणे अनलॉक केल्यावर गाड्यांची संख्या वाढू शकते. त्याचबरोबर माता वैष्णो देवीसाठीही ट्रेन सुरू केली जाईल.