Ministry of Indian Railways । 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय रेल्वे (Indian Railways) गाड्यांमध्ये आता जैव शौचालये बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सध्या जैव शौचालये बसविण्याचे काम देखील सुरु झालं आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) पर्यावरणपूरक व मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच, भारतातील आतापर्यंत 73 हजार रेल्वे डब्यांमध्ये अडीच लाखांपेक्षा अधिक जैव-शौचालये बसविण्यात आलीय. या निर्णयामुळे आता रेल्वेमार्गावर (Railway line) मानवी मलमूत्र विसर्जित होऊन लोकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणार दुष्परिणाम टाळता येऊ शकणार आहे. (More than two and a half lakh bio-toilets installed in 73 thousand vehicles)

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) एक महत्वाचं पाऊल टाकत हा निर्णय घेतलं आहे.
तसेच, आतापर्यंत 73 हजार रेल्वे डब्यांमध्ये 2 लाख 58 हजार 906 जैव शौचालये बसविण्यात आली आहेत.
तर, रेल्वेस्थानक आणि लोहमार्ग साध्या रचनेच्या शौचालयांमुळे प्रवास्यांना समस्या निर्माण होत होता.
कारण मलमूत्र विसर्जन थेट रेल्वे मार्गावर (Railway line) होत असल्याने त्या ठिकाणी आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्यासोबतच पर्यावरणावर देखील दुष्परिणाम होत होता. तसेच, दिवसाला रेल्वेगाड्यांमधून रेल्वे मार्गावर (Railway line) विसर्जित होणारे 2 लाख 74 हजार लिटर मानवी मलमूत्र अटकाव घालण्यात यश येणार आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) यामध्ये पुढाकार घेत आपल्या सर्व रेल्वे डब्यांमध्ये जैव-शौचालये बसविली गेली आहेत.

या दरम्यान, भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) रेल्वेच्या डब्यांमध्ये जैव-शौचालय बसविण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. प्रत्येक विभागाला आपापल्या गाड्यांमध्ये जैव-शौचालय बसविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे लक्ष देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर प्रथम मध्य रेल्वेकडून (Central Railway) आपल्या सर्व गाडय़ांमधील 5 हजार रेल्वे डब्यांमध्ये जैव-शौचालये बसविली गेली आहे.

काय आहे नेमकी प्रक्रिया ?

भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये (Indian Railways) हे बसविलेले जैव-शौचालयांची सुविधा यामध्ये रेल्वे डब्यांमध्ये शौचालयाच्या खालील भागात एका मोठ्या रचनेची टाकी बसविली आहे. त्या टाकीत जीवाणूंची पैदास करत मानवी मैल्याचे त्यांच्यामार्फत पाण्यामध्ये रूपांतर केले जाते. त्यानंतर क्लोरिनच्या सहाय्य्याने ते पाणी स्वच्छ केले जाते. अशाप्रकारे लोहमार्गावर फक्त प्रदूषणमुक्त पाणीच बाहेर टाकले जाते.

या प्रक्रियांमुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत नाही. त्याचबरोबर मानवी आरोग्यावर देखील कोणते दुष्परिणाम होत नाही. आता केवळ वापरात असणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये ही शौचालये बसविण्यात आली आहेत. नवीन निर्मिती होत असलेल्या रेल्वेच्या डब्यांमध्ये आता जैव-शौचालयेच बसविण्यात येत आहेत.
म्हणून पुढील काळात भारतातील सर्वच रेल्वे गाड्यांत जैव शौचालये बसवण्यात येतील असं रेल्वे विभागाने (Indian Railways) सांगितलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : indian railways step more two and half lakh bio toilets installed 73000 trains

हे हि वाचा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई;
भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स

Nitesh Rane | नितेश राणेंनी सेनेला डिवचले; म्हणाले – ‘शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय’