home page top 1

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! रेल्वेकडून नवी ‘सुविधा’, प्रवासादरम्यान 100 रूपयात ‘मसाज’

नवी दिल्ली : वृत्तासंस्था – प्रवाशांच्या सुविधेचा विचार करता भारतीय रेल्वेने अनेक नव्या नव्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात आता भर पडणार असून पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सेवेत नवी सुविधा घेऊन येत आहे. ही अशी सुविधा असेल जी या आधी तुम्हाला रेल्वेमध्ये कधीच मिळाली नसेल. परंतू आता रेल्वे प्रवाशांची उत्तम खातिरदारी करणार आहे. या सुविधे अंतर्गत चालत्या रेल्वेत प्रवाशांची मसाज करुन देण्याची अनोखी सुविधा रेल्वे प्रवाशांना देणार आहे. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. लवकरच ही सुविधा रेल्वेकडून प्रवाशांना पुरवण्यात येईल.

रतलाम मंडल या समितीने या बाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. रेल्वे बोर्डाच्या मिडिया आणि संचार निर्देशक राजेश बाजपेयी यांनी सांगितले आहे की, पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या रतलाम मंडल या समितीने हा प्रस्ताव तयार केला आहे. आधिकाऱ्यांच्या मते, रेल्वे इंदोर मधील चालणाऱ्या 39 रेल्वेमध्ये ही सुविधा सुरुवातीला उपलब्ध करुन देण्यात येईल. यात देहरादून – इंदोर एक्सप्रेस (14317), नवी दिल्ली – इंदोर इंटरसिटी एक्सप्रेस (12416) आणि इंदोर – अमृतसर एक्सप्रेस (19325) याचा समावेश असेल.

प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी मसाज सुविधा –
वाजपेयी यांनी सांगितले की, असे भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांच होणार आहे की प्रवाशांना चालत्या रेल्वेत मसाजची सुविधा देण्यात येणार आहे. याने फक्त रेल्वेची महसूलच वाढणार नाही तर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढेल. त्यांनी सांगितले की असे पहिल्यांदाच झाले असेल की अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेचा महसूल वाढणार –
याचा फायदा रेल्वेच्या महसूलात वाढ होऊन होणार असून यातून रेल्वेला 20 लाखाचा महसूल मिळण्याची खात्री आहे. या सेवेने वर्षाला रेल्वेचे 20 हजार प्रवाशी वाढू शकतात आणि त्यातून वाढलेल्या तिकीट विक्रीतून 90 लाखाचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी असे देखील सांगितले की येथे 15 – 20 दिवसात ही सुविधा सुरू होणार असून प्रवासी याचा लाभ घेऊ शकतात.

100 रुपयांत करा रेल्वेत मसाज –
ही सुविधा सकाळी 6 ते रात्री 10 पर्यत प्रवाशांना मिळू शकते, यासाठी डोक्यापासून पायापर्यंत एकदा मसाज करण्यासाठी प्रवाशांना 100 रुपये खर्च येईल. त्यासाठी रेल्वेत मसाजसाठी काही प्रतिनिधी असतील. त्यांना रेल्वेकडून ओळखपत्र देखील देण्यात येईल.

Loading...
You might also like