भारतीय रेल्वेचा ‘क्लोन ट्रेन’ चालवण्याचा विचार, जाणून घ्या प्रवाशांना कसा होईल फायदा ?

नवी दिल्ली,वृत्तसंस्था : आपण आपले सामान घेऊन रेल्वे स्थानकात पोहोचतात, परंतु आपल्याकडे कन्फर्म केलेले तिकीट नसते. आपल्याला आशा असते की एखाद्या चमत्काराने वेटिंग तिकीट कन्फर्म होईल आणि आपल्याला बर्थ मिळेल. पण, तिकीट कन्फर्म होत नाही आणि ट्रेन तुमच्याशिवाय निघून जाते. काय होईल जर त्या गाडीच्या सुटल्यानंतर काही वेळानंतरच दुसरी ट्रेन त्याच प्लॅटफॉर्मवर यावी आणि आपल्याला त्याच वेटिंग तिकिटावर बर्थ मिळावी व आपण आधीपासून ठरलेल्या वेळेच्या थोड्याशा फरकाने आपला प्रवास पूर्ण करावा. हे सर्व स्वप्नासारखे वाटत आहे, परंतु आता ते खरे होणार आहे.

भारतीय रेल्वे बनवत आहे व्यस्त मार्गावर क्लोन गाड्या चालवण्याची योजना

भारतीय रेल्वेने देशातील ज्या मार्गांवर वेटिंग लिस्‍ट सतत असते त्यावर कन्फर्म तिकिटे देण्याची नवीन योजना तयार केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक प्रवाशाला व्यस्त मार्गावर कन्फर्म तिकीट मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वे क्लोन ट्रेन चालवण्याचा विचार करीत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, मुख्य रेल्वे जाण्याच्या एका तासानंतर त्याच मार्गाची आणखी एक ट्रेन त्याच प्लॅटफॉर्मवरून जाईल, जी वेटिंग लिस्‍टवाल्या प्रवाशांना घेऊन जाईल. यामुळे वेटिंग तिकिटे असलेले प्रवासी कोणत्याही अडचणीशिवाय जवळजवळ त्याच वेळी त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतील.

क्लोन गाड्या चालवण्याची योजना सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात बनवण्यात आली होती

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात भारतीय रेल्वेने क्लोन ट्रेनची योजना आखली होती, परंतु काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता लवकरच भारतीय रेल्वे ही योजना प्रत्यक्षात रूपांतरित करणार आहे. भारतीय रेल्वेने असे म्हटले आहे की वेटिंग लिस्‍टवाल्या प्रवाशांना कन्फर्म बर्थ देण्यासाठी क्लोन ट्रेन चालविली जाईल. ही क्लोन ट्रेन मार्गावर धावणारी अतिरिक्त ट्रेन असेल. म्हणजेच दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी एक्‍सप्रेसमध्ये नेहमीच खूप गर्दी असते. मोठ्या संख्येने लोकांचे तिकीट कन्फर्म होत नाही. अशा परिस्थितीत वेटिंग लिस्‍ट मधील प्रवाशांना क्लोन ट्रेनमध्ये कंफर्म बर्थ मिळेल.

क्लोन गाड्या कमी स्थानकांवर थांबतील, ही स्थानके सुरू होऊ शकतात

रेल्वेच्या म्हणण्यानुसार ही क्लोन ट्रेन मुख्य ट्रेनपेक्षा कमी स्थानकांवर थांबेल. भारतीय रेल्वेने असे सांगितले आहे की पुढील काही काळापर्यंत अधिकारी अशा गाड्या आणि व्यस्त मार्गांवर लक्ष ठेवतील. सुरुवातीला क्लोन गाड्या ट्रायल अंतर्गत चालवल्या जातील. ट्रायल यशस्वी झाल्यास, भविष्यात ती नियमित केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेटिंग लिस्‍टमधील प्रवाशांना क्लोन ट्रेनमध्ये कन्फर्म बर्थची माहिती चार तासांपूर्वीच मिळेल. क्लोन गाड्या हावडा, मुंबई सीएसटी, चेन्नई, सिकंदराबाद आणि नवी दिल्ली येथून धावू शकतात. वास्तविक या स्थानकांवर मोठे यार्ड आहे, जेणेकरून मुख्य ट्रेन सुटल्यानंतर लगेचच क्लोन ट्रेन चालवणे सोपे होईल.

या सर्व व्यस्त मार्गावर भारतीय रेल्वे क्लोन ट्रेन चालवू शकते

भारतीय रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी देखील अशा व्यस्त मार्गांची ओळख पटविण्यात आली होती, ज्यांमध्ये दिल्ली-मुंबई, दिल्ली-भोपाळ, चेन्नई-तिरुअनंतपुरम, दिल्ली-लखनऊ आणि दिल्ली-पटना या मार्गांचा समावेश होता. या क्लोन गाड्या त्या सर्व मार्गांवर चालवल्या जाऊ शकतात, ज्यांवर राजधानी, शताब्दी आणि दुरंतो गाड्या धावतात. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, शक्य आहे की एखाद्या ट्रेनमध्ये स्लीपर क्लासची वेटिंग लिस्‍ट 400, थर्ड एसी किंवा चेअर कार 300, फर्स्ट क्लास 30 आणि सेकंड क्लास 100 च्या पुढे गेल्यास क्‍लोन ट्रेन चालविली जाऊ शकते. याद्वारे रेल्वेला तिकीट कन्फर्म नसल्यास पैसे परत करावे लागणार नाहीत. यामुळे रेल्वेची मिळकत वाढेल.

पर्यायी सेवेमध्ये त्याच मार्गाच्या दुसर्‍या ट्रेनमध्ये मिळत होती कन्फर्म बर्थ

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात अशीच एक गाडी सुरू करण्यात आली होती, ज्याला पर्यायी सेवा असे नाव देण्यात आले. पर्याय सेवेअंतर्गत त्याच मार्गावरील इतर गाड्यांमध्ये वेटलिस्टच्या प्रवाशांना कन्फर्म बर्थ प्रदान करण्यात येत होते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना सहसा पुढील ट्रेनची 12-12 तास प्रतीक्षा करावी लागत असे. त्याचबरोबर व्यस्त मार्गांवर तिकिटांची बुकिंग करण्याची प्रचंड संख्या पाहता पर्याय सेवेअंतर्गत बर्थ पर्याप्‍त होत नव्हते. अशा परिस्थितीत आता सुरू होणाऱ्या क्लोन ट्रेनमुळे कन्फर्म तिकिटांच्या समस्येपासून प्रवाशांना दिलासा मिळेल आणि त्यांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही.