87 वर्षानंतर ‘या’ मार्गावर धावणार ट्रेन, 1934 मध्ये भूकंपाच्या नंतर तुटले होते रेल्वे नेटवर्क

समस्तीपुर : पोलीसनामा ऑनलाइन –  समस्तीपुर रेल्वे मंडळाच्या सहरसा – सरायगढ – झंझारपुर – दरभंगा रेल्वे मार्गावर 1934 च्यानंतर स्पीड ट्रायलसाठी आज म्हणजे शनिवारी ट्रेन धावली. सुमारे 87 वर्षानंतर येथे ट्रेन धावली आहे. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी सांगितले की, कोसी रेल्वे ब्रिजहून वाया सुपौल – सरायगढ – निर्मली – झंझारपुरहून सहरसा आणि दरभंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे ट्रॅक, रेल्वे पूल, स्टेशन इत्यादीची जीएम तपासणी करण्यात आली.

आता 87 वर्षानंतर निर्मलीहून सरायगढ रेल्वे लिंकशी जोडले जाईल. अशाप्रकारे कोसी आणि मिथिलांचलच्या दरम्यान थेट रेल्वेसेवा लवकरच सुरू होईल. पूर्व मध्य रेल्वेचे जीएम ललित चंद्र त्रिवेदी यांनी म्हटले की, सप्टेंबर 2020 मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी कोसी ब्रिज राष्ट्राला समर्पित केला होता. तेव्हापासून कोसी आणि मिथिलांचलच्या लोकांना आशा होती की, रेल्वे सेवेने ते थेट जोडले जातील.

आसनपुर कुपहा – निर्मली – झंझारपुर मार्गावर स्पीड ट्रायल

समस्तीपुर मंडळनुसार आसनपुर कुपहा निर्मली – झंझारपुर रेल्वेमार्गावर स्पीड ट्रायल घेतली जात आहे. कोसीला मिथिलांचल जोडण्यारे आसनपुर कुपहा – निर्मली – झंझारपुर रेल्वेमार्गावर गेज परिवर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. या कारणामुळे दोन दिवसांची स्पीड ट्रायल केली जात आहे.

समस्तीपुर रेल्वे मंडळाचे मीडिया प्रभारी सरस्वती चंद्र यांनी सांगितले की, या रेल्वे मार्गाची जीएम ललित चंद्र त्रिवेदी यांनी शनिवारी तपासणी केली. यानंतर सीआरएसचे निरीक्षण केले जाईल. त्यांच्या निरीक्षणानंतर हिरवा झेंडा मिळताच या रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी ट्रेनचे संचालन सुरू केले जाऊ शकते.

ऑटोमेटिक कोच वॉशिंग प्लँटचे जीएमने केले उद्घाटन

समस्तीपुर रेल्वे मंडळाच्या सहरसा स्टेशनच्या कोचिंग डेपोमध्ये बनवण्यात आलेल्या ऑटोमेटिक कोच वॉशिंग प्लँटचा शुभारंभ पूर्व मध्य रेल्वेचे जीएम ललित चंद्र त्रिवेदी यांनी केला. त्यांनी म्हटले की, स्वच्छता अभियान अंतर्गत रेल्वेत सुद्धा स्वच्छतेवर जोर दिला जात आहे. या वॉशिंग प्लँटमध्ये अर्धातासातच दोन ट्रेनचे कोच चांगल्या प्रकारे स्वच्छ होतील.

जीएमने म्हटले की, बिहारमध्ये हा ऑटोमेटिक कोच वॉशिंग प्लँट पहिलाच आहे जो सहरसामध्ये स्थापन करण्यात आला आहे. डीआरएम अशोक माहेश्वरी यांनी सांगितले की, समस्तीपुर मंडळात प्रथम ऑटोमेटिक कोच वॉशिंग प्लँट सहरसा स्टेशनवर तयार करण्यात आला आहे. या वॉशिंग प्लँटच्या शुभारंभासह ट्रेनच्या बोगींच्या बाहेरील भागाची स्वच्छता खुपच कमी वेळात होईल, तसेच पाण्याची सुद्धा खुप बचत होईल.