उत्सवाच्या हंगामात रेल्वेने प्रवास करताय ?, ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा केली जाईल कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी काही नियम बनवले आहेत. सर्व रेल्वे प्रवाश्यांनी रेल्वेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रवाश्यांनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाईल. रेल्वेने म्हटले आहे की, रेल्वे प्रवाशांना विनंती केली जात आहे कि, सर्व फेस्टिव्हल विशेष गाड्या पूर्णपणे राखीव गाड्या आहेत. कोणत्याही प्रवाशाने कन्फर्म तिकिटाशिवाय रेल्वे स्थानकावर येऊ नये. दरम्यान, प्रवाश्यांच्या सोयीसाठी सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर पुरेशा आरक्षणाचे काउंटर सुरू आहेत. तेथून प्रवाशांना तिकिट आरक्षण मिळू शकते.

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाची माहिती ….
रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटांशिवाय असणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांची गरज भागविण्यासाठी आरक्षण काउंटर-प्रवासी तिकिट सुविधा केंद्रे उघडली गेली आहेत.
रेल्वे स्थानकांवर नियमित घोषणा केल्या जात आहेत. जेणेकरून या सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित गाड्या असल्याची माहिती प्रवाशांना दिली जाऊ शकते. कोविड – 19 चा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रवाशांना खबरदारी घेऊन सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले जात आहे.
मास्क व्यवस्थित घाला.
सामाजिक अंतर राखणे.
कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींना रेल्वे क्षेत्रात प्रवेश करण्याची किंवा ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी नाही.
आरोग्य तपासणी पथकाने रेल्वे स्थानकात प्रवास करण्यास नकार दिल्यानंतर ट्रेनमध्ये चढणे हा गुन्हा आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा देखील दंडनीय गुन्हा आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार कोविड – 19 प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे कायदा 1989 अंतर्गत कारवाई केली जाईल.