आर्थिकराष्ट्रीय

Indian Railways | झोपेतून उठवून ट्रेनचे तिकिट तपासू शकत नाही TTE, रेल्वे प्रवाशांना देते असेच आणखी अनेक अधिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Railways | भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात आणि रेल्वे त्या प्रवाशांच्या सोयीची पूर्ण काळजी घेते. असे असतानाही अनेकवेळा प्रवाशांना प्रवासादरम्यान नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. (Indian Railways)

 

अशीच एक समस्या रेल्वे तिकीट तपासणीचीही आहे. तुमच्यासोबत असेही झाले असेल की प्रवासादरम्यान तुम्ही रात्री झोपेत असाल आणि टीटीने येऊन तुम्हाला उठवले. केवळ तिकीट दाखवण्याच्या नावाखाली तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून रेल्वेने व्यवस्था केली आहे. आता रात्री 10 नंतर प्रवाशांना झोपेतून उठवून टीटीई तिकीट तपासू शकत नाही. (Indian Railways)

 

काय सांगतो नियम

भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करतात. यातील बहुतेकांना लांबच्या प्रवासामुळे ट्रेनमध्येच रात्र काढावी लागते.
अशावेळी, रात्री झोपताना टीटीईने तिकीट तपासणे सामान्य आहे.

पण, रेल्वेने अशी व्यवस्था दिली आहे की, जर एखादी व्यक्ती सकाळपासून प्रवास करत असेल,
तर रात्री 10 नंतर टीटीई त्याला तिकीट मागू शकत नाही किंवा त्याचे आयडी तपासू शकत नाही. (Indian Railways)

रेल्वेच्या नियमांनुसार, टीटीईला सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ट्रेनचे तिकीट तपासण्याचा अधिकार आहे.
जर एखादा प्रवासी सकाळपासून प्रवास करत असेल तर त्याला रात्री 10 नंतर उठवता येत नाही.
तथापि, जर एखादा प्रवासी रात्री 10 वाजल्यानंतर ट्रेनमध्ये चढला तर त्याचे तिकीट तपासण्याचा अधिकार टीटीईकडे आहे.

 

दोन स्टॉपपर्यंत सुरक्षित राहते तुमची सीट

ट्रेनमधील तुमची आरक्षित सीट फक्त दोन थांब्यांसाठी सुरक्षित राहते.
यानंतरही तुम्ही तुमच्या सीटवर न पोहोचल्यास, टीटीई इतर कोणत्याही प्रवाशाला ती वाटप करू शकतो.
याचा अर्थ असा की टीटीई तुमची सीट इतर कोणासही तुमच्या बोर्डिंग स्टेशनच्या पुढील दोन स्टॉपपर्यंत किंवा 1 तासासाठी ती देऊ शकत नाही.

या दोनपैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता झाल्याय, तुमची सीट दुसर्‍या प्रवाशाला दिली जाते,
कारण तुम्ही ट्रेन पकडली नाही असे टीटीई गृहीत धरतो.

प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी रेल्वे सातत्याने नवनवीन यंत्रणा अद्ययावत करत असते.
अलीकडे रेल्वेने अलार्मची सुविधाही सुरू केली आहे.
या अंतर्गत रेल्वे तुम्हाला तुमच्या नियुक्त स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी अलार्मद्वारे माहिती देईल.

वास्तविक, रात्री झोपताना तुमचे स्टेशन आले, तर अनेक प्रवाशांना वेळेवर उठता येत नाही.
या गैरसोयीपासून वाचण्यासाठी रेल्वेने ही सेवा सुरू केली आहे.

 

Web Title :- Indian Railways | tte could not check your ticket after 10 pm in train know how this law is works

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button