भारतीय रेल्वेत होणार ‘मेगा भरती’ 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतातील बेरोजगार तरुणांना आता लवकरच एक खूशखबर मिळणार आहे. भारतीय रेल्वेत कर्मचाऱ्यांची मोठी भरती कारण्याबाबद माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली. गेल्या वर्षात रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख लोकांची रेल्वेत भरती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
2 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रेल्वेत भरल्या जाणार आहेत. सध्याच्या घडीला 1 लाख 32 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. आगामी दोन वर्षात 1 लाखांहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सी व डी गटातील जागा आणि आता निघणाऱ्या जागा अशा सर्व मिळून येत्या दोन वर्षात जवळपास रेल्वेत 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.
https://twitter.com/ANI/status/1088045201770262528

दरम्यान, या भरती मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांना 10 टक्के आरक्षणचा फायदा होणार आहे. मेगा भरतीच्या पहिल्या टप्प्यात जवळपास एक लाख 31 हजार 428 जागांसाठी जाहिरात निघणार आहे. ही जाहिरात येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात 99 हजार जागांसाठी 2020 मध्ये मे किंवा जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

https://twitter.com/PiyushGoyalOffc/status/1088024815376551936