प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ विशेष रेल्वे गाडया लवकरच होणार सुरू, जाणून घ्या लिस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक पाऊल उचलले आहे. रेल्वेकडून अनेक गाड्यांचा ऑपरेटिंग कालावधी वाढवण्यात आला आहे. तसेच काही साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयानंतर प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.

पश्चिम रेल्वेने सांगितल्यानुसार, प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन अहमदाबाद ते पुणे, भुज ते पुणे आणि भगतची कोठी ते पुणे दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येतील. त्याशिवाय, दररोज दिल्ली सराय रोहिल्लावरही विशेष गाडी चालविली जात आहे. ज्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत, अशा गाड्यांसाठी २३ जानेवारीपासून प्रवाशांना तिकीटाची बुकिंग करता येणार आहे.

‘या’ गाड्यांचा कालावधी वाढवला

रेल्वेने वाढविलेल्या गाड्यांमध्ये हावडाहून धनबादमार्गे धावणारी बाडमेर विशेष रेल्वे, गोमोहून धावणारी भुवनेश्वर- आनंद विहार विशेष रेल्वेसह इतर गाड्यांचा समावेश आहे.

ट्रेन नंबर : ०९६०८ / ०९६०७ : मदार-कोलकाता मदार साप्ताहिक विशेष ट्रेन १ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी (दर सोमवारी) आणि कोलकाताहून ४ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीपर्यंत (दर गुरुवारी) धावणार आहे.

ट्रेन नंबर : ०२३२३ / ०२३२४ : हावडा-बाडमेर-हावडा साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल विशेष गाड्यांचा ऑपरेटिंग कालावधी वाढविण्यात आला. उत्तर पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हावडा २९ जानेवारी २०२१ ते २६ मार्च २०२१, तर बाडमेरहून ३ फेब्रुवारी ते ३१ मार्च ला कालावधीत धावणार आहे.

>> ट्रेन नंबर ०२३२४ : बाडमेर हावजा एक्सप्रेस – ३ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंत धावेल.

>> ट्रेन नंबर ०२८१९ : भुवनेश्वर आनंदविहार एक्सप्रेस – २ फेब्रुवारीपासून २१ मार्चपर्यंत धावेल.

>> ट्रेन नंबर ०२८२० : आनंदविहार भुवनेश्वर हिमगिरी एक्सप्रेस – ४ फेब्रुवारीपासून ३० मार्चपर्यंत धावेल.

>> ट्रेन नंबर ०२३३१ : हावडा जम्मूतवी हिमगिरी एक्सप्रेस – ३० जानेवारीपासून ३० मार्चपर्यंत धावणार आहे.

>> ट्रेन नंबर ०२३३२ : जम्मूतवी हावडा हिमगिरी एक्सप्रेस – १ फेब्रुवारीपासून १ एप्रिलपर्यंत धावणार आहे.

>> ट्रेन नंबर ०३०१९ : हावडा काठगोदाम बाघ एक्सप्रेस – ३१ जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत धावेल.

>> ट्रेन नंबर ०३०२० : काठगोदाम हावडा बाघ एक्सप्रेस – २ फेब्रुवारीपासून २ एप्रिलपर्यंत धावेल.