‘Uber अ‍ॅप’मधील व्हायरस ‘या’ भारतीयानं शोधला, मिळालं 4.61 लाख रूपयाचं ‘बक्षिस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन सायबर सिक्युरिटी रिसर्चर आणि भारतीय एथिकल हॅकर आनंद प्रकाश यांनी उबेरच्या अ‍ॅपमध्ये एक बग शोधुन काढला आहे. कॅब सर्व्हिस देणाऱ्या Uber अ‍ॅप मधील कमतरतेमुळे हॅकर्स यूजर्स अकाऊंटला सहज लॉगइन करु शकत होते. जर उबेर वॉलेटमध्ये पैसे असतील तर त्याचा वापर देखील करु शकते होते.

याच कमतरतेला ठीक करण्यासाठी Uber ने आनंद प्रकाश यांना 6,500 डॉलर म्हणजेच जवळपास 4.61 लाख रुपये दिले. आनंद प्रकाश यांनी सांगितले की, बगमुळे यूजर्सची लोकेशन ट्रेस करता येत होती. हा बग उबेरच्या API रिक्वेस्ट फंक्शनमध्ये होता. या टोकनमुळे यूजरची संपूर्ण राइडची हिस्ट्री मिळत होती.

यामुळे यूजरचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर देखील समजत होता. परंतू उबेरने स्पष्ट केले की आता पर्यंत कोणत्याही हॅकरने या बगचा चूकीचा वापर केलेला नाही.

याआधी देखील मिळाले होते बक्षीस –
आनंद प्रकाश यांना याआधी देखील बग शोधून देऊन प्रश्न सोडवल्यामुळे बक्षीस मिळाले होते. या बगमुळे कोणीही आयुष्यभर अनलिमिटेड राइडचा फायदा घेऊ शकत होता. याशिवाय त्यांनी गुगलच्या सिक्युरिटीचा बग ठीक केला होता. त्याचे त्यांना 1.2 कोटी रुपये मिळाले होते.