भारतीय राजकारणावर ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यासह ‘या’ 6 शाही परिवारातील सदस्यांची ‘छाप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या राजकारणामध्ये बरीच कुटुंबे अतिशय प्रभावशाली मानली जातात. अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांचे राजकारणात वर्चस्व पिढ्यानपिढ्या चालू आहे. अशा काही कुटुंबांबद्दल जाणून घ्या.

1) सिंधिया घराणे :
ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याने गेली 6 दशके देशाच्या राजकारणावर वर्चस्व राखले आहे. या राजघराण्यातील राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. 1957 मध्ये राजमातांनी गुना येथून लोकसभेची जागा जिंकली. त्यानंतर या राजघराण्यानेही राजकारणावर वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली. राजमातांची एक मुलगी वसुंधराराजे राजस्थानच्या मुख्यमंत्रीदेखील राहिली आहे. 2001 मध्ये वडील माधवराव सिंधिया यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काॅंग्रेसची सूत्रे हाती घेतली. पुढच्याच वर्षी ते गुनाचे खासदार म्हणून निवडून आले आणि 2019 पूर्वी ते सात्यत्याने जिंकत राहिले. आज, 11 मार्च रोजी ज्योतिरादित्य काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले.

2) महाराजा घराण्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग :
हे राजकारणातील मोठे नेते मानले जातात. 1942 मध्ये पटियालाच्या घरात जन्मलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 1980 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक लढविली आणि जिंकली. 1984 मध्ये त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेधार्थ लोकसभा आणि काॅंग्रेस या दोन्ही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि शिरोमणी अकाली दलात सामील झाले. 1992 मध्ये ते अकाली दलापासून निराश झाले आणि त्यांनी शिरोमणी अकाली दल (पी) नावाचा नवा पक्ष स्थापन केला, जो नंतर काॅंग्रेसमध्ये विलीन झाला. सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. याआधीही 2002 ते 2007 या काळात ते पंजाबचे मुख्यमंत्री होते.

3) दिया कुमारी :
जयपूर राजघराण्याचाही राजकारणाशी संबंध आहे. जयपूरचे महाराज ब्रिगेडिअर भवानी सिंग यांची कन्या दीया कुमारी ह्या भाजपकडून स्टेट असेम्ब्ली प्रतिनिधी आहेत. त्यांचे वडील भवानीसिंग यांनीही 1989 मध्ये लोकसभेची निवडणूक काॅंग्रेसच्या तिकिटावर लढविली होती परंतु ते पराभूत झाले होते. दिया या राजमाता गायत्री देवी यांच्या नात असून तिने राजकारणात आपले आकर्षण आणि वैभव आणले आहे.

4) दिग्विजय सिंह :
तीव्र टीकाकारांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्विजय सिंह हेदेखील राजघराण्याशी संबंधीत आहेत. त्यांचे वडील स्व. बलभद्र सिंह हे गुना जिल्ह्यातील राघवगड राजघराण्याचे राज्यकर्ते होते. दिग्विजय सिंह सध्या काॅंग्रेसचे सरचिटणीस आहेत. याआधी ते काॅंग्रेसमधूनच दोनदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

5) समरजीत सिंह गायकवाड :
वडोदराच्या गायकवाड राजघराण्याचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांमध्ये  गणले जाते. समरजितसिंग गायकवाड बडोद्याच्या गायकवाड घराण्याचे सध्याचे महाराज आहेत. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु अद्यापपर्यंत ते सक्रिय राजकारणात दिसलेले नाहीत. लक्ष्मीविलास पॅलेस म्हणून ओळखले जाणारे त्यांचे निवासस्थान 600 एकरांवर पसरलेले आहे आणि येथे 187 खोल्या आहेत. गुजरातच्या देवस्थानांमध्ये येणाऱ्या चढाव्याचा मोठा भागही त्यांच्याकडे येतो.

6) ओमर अब्दुल्ला :
काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचे राजघराणे हे राजकारणामध्ये चांगलेच सक्रिय आहे. ओमर यांचे आजोबा शेख अब्दुल्ला शेर-ए-काश्मीर म्हणून ओळखले जातात. ते काश्मीरचे पंतप्रधान आणि नंतर मुख्यमंत्री होते. त्यांनी ‘नेका’ची स्थापना केली. त्यांचा मुलगा फारुख अब्दुल्ला हे 2009 आणि 2014 मध्ये यूपीए 2 सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि राज्यातील बऱ्याच पदांवर मुख्य भूमिकेत आहेत. त्याचवेळी, उमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून 6 वर्षे काम देखील केले.