धावपटू दुती चंदचा आणखी एक खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुती चंदने नुकतेच समलैंगिक असल्याचे जगजाहिर केले होत. तिचे ओडिशाच्या चाका गोपालपुर येथी एका मैत्रीणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीने सांगितले होते. मात्र मैत्रीणीची ओळख पटू नये यासाठी तिने मैत्रीणीचे नाव सांगण्यास नकार दिला. भारतीय क्रीडा क्षेत्रात समलैंगिक असल्याचा खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिच्या या खुलाशामुळे आणि धाडसामुळे तिचे कौतुक करण्यात आले. आता दुतीने आणखी एक खळबळजनक खुलसा केला आहे.

खुलासा करताना दुती म्हणाली, २००९ मध्ये माझे एका मुलासोबत अफेअर होते. हे अफेअर पाचवर्षे चालले होते. ज्या मुलासोबत माझे अफेअर सुरु होते त्याच्यासोबत मी पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, नंतर आमचे ब्रेकअप झाल्याचा खुलासा तिने केला आहे.

आपल्या समलैंगिक विषयी बोलताना म्हणाली, मला समजून घेणारा जिवनसाथी मिळाला आहे. आपल्यासोबत आयुष्य घालवायचे आहे, त्याचे स्वातंत्र्य सर्वांना मिळायला हवं. समलैंगिक असलेल्यांना मी नेहमी पाठींबा दिला आहे आणि ही वैयक्तीक निवड आहे. समलैंगिक संबंध ठेवणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्याचा आदर करायला हवा. मि सध्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करत असून २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देणारच असा निर्धारही तिने बोलून दाखवला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like