चीनमधील रहस्यमयी व्हायरसची भारतीय शिक्षिकेला ‘लागण’, ‘संसर्ग’ झालेली पहिली परदेशी माहिला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या रहस्यमय विषाणूमुळे एक भारतीय शिक्षिका बळी पडली आहे. या 45 वर्षीय या शिक्षिकेवर शेनजेन शहरात स्ट्रेप्टोकोकल संसर्गावर उपचार सुरू आहेत. हा अज्ञात व्हायरस हळूहळू पसरत आहे. शेनजेन व्यतिरिक्त वुहान प्रांतातही अश्या घटना घडत आहेत. दरम्यान, ही शिक्षिका ही पहिली परदेशी महिला आहे जिला कोरोना व्हायरससारख्या या रहस्यमय एसएआरएस (सार्स) ची लागण झाली आहे. प्रीती माहेश्वरी या शेनजेन येथील आंतरराष्ट्रीय शालेय शिक्षिका आहेत. त्या स्ट्रेप्टोकोकल संसर्गावर उपचार घेत आहेत. तिचे पती आशुमान खोवाल यांनी सांगितले की ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. यापूर्वी अशी शंका होती की माहेश्व्ररी नवीन प्रकारच्या कोरोना व्हायरसने ग्रस्त आहे. परंतु नंतर तिच्या पतीने स्पष्ट केले की, त्यांच्या पत्नीला स्ट्रेप्टोकोकल संसर्ग झाला आहे.

चीनचे वुहान शहर नवीन रहस्यमय व्हायरल न्यूमोनियामुळे असुरक्षित आहे. अधिकृत माध्यमांच्या वृत्तानुसार, निमोनियाच्या तात्पुरत्या तपासणीत ते कोरोना व्हायरसचे असल्याचे उघड झाले आहे. वुहानमध्ये आतापर्यंत 17 नवीन घटना समोर आल्या आहेत. आता येथे एकूण प्रकरणे 62 वर पोहोचली आहेत.

2002 मध्ये 650 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू :
कोरोना व्हायरस हा व्हायरसचा एक मोठा गट आहे, परंतु यापैकी केवळ सहा व्हायरस लोकांना संसर्गित करतात. सामान्य परिणाम सर्दी-थंडी आहेत, परंतु एसएआरएस (सिव्हन एक्युट रेस्पीरी सिंड्रोम) असा कोरोनाव्हायरस आहे. ज्यामुळे 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सुमारे 650 लोकांचा मृत्यू झाला होता.

भारताने जारी केले एडवाइजरी :
चीनच्या वुहानमध्ये निमोनियाचा नवीन प्रादुर्भाव झाल्यामुळे दुसर्‍या मृत्यूनंतर भारताने शुक्रवारी चीनला जाणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी एडवाइजरी जारी केली. वुहानमध्ये सुमारे 500 भारतीय वैद्यकीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जपान आणि थायलंडमध्येही यासंबंधी प्रकरण समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –