Corona Virus : ऑस्ट्रेलियामध्ये ‘कोरोना’ विषाणूवरील ‘लस’ शोधली भारतीय शास्त्रज्ञांनी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरस ने विध्वंस पसरवला आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी लस तयार करण्याचे काम सध्या सगळीकडे सुरू आहे, मात्र ऑस्ट्रलियामध्ये भारतीय वैज्ञानिकाच्या नेतृत्वात हे औषध बनवण्यास यश आले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड रिसर्च ऑर्गनायझेशन (CSIRO) च्या एका उच्च सुरक्षाबद्ध असणाऱ्या लॅबमध्ये संशोधन करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डॉर्टी इन्स्टिट्यूट मधील संशोधकांनी मागील आठवड्यात एका व्यक्तीच्या नमुन्यातून व्हायरस अलग करण्यात यश मिळवले आहे. CSIRO मध्ये व्हायरसच्या वाढीचा विचार करता प्री-क्लिनिकल स्टडीसाठी मोठ्या संख्येने याची आवश्यकता आहे.
विलग केलेल्या व्हायरसला सामायिक केले
प्राध्यापक एस. एस. वासन CSIRO डेंजस पैथोजेंस टीमचे नेतृत्व करीत आहेत. या यशाची पुष्टी करताना प्राध्यापक एस एस वासन यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, ‘आम्ही डॉर्टी इन्स्टिट्यूटच्या आमच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी आमच्याबरोबर विलग केलेल्या व्हायरसला सामायिक केले. रिअल व्हायरससह कार्य करणे हे वेगवान असते आणि प्री – क्लिनिकल स्टडीमुळे लवकर औषधे तयार करण्यात मदत होत असते.’
वासन यांनी पुढे सांगितले की, ‘ऑस्ट्रेलियन अॅनिमल हेल्थ लॅबमधील माझे सहकारी देखील डायग्नोस्टिक, सर्विलांस आणि रिस्पॉन्स यावर काम करत आहेत. तसेच CSIRO चा दुसरा भाग (Manufacturing) क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीकडून बनवण्यात येणारी लस प्रतिजन वाढविण्यासाठी पाठिंबा देत आहे.
ते म्हणाले की त्यांची लॅब सध्या व्हायरस स्टॉक वाढवण्यावर काम करत आहे. तथापि, त्यांनी यामधील संख्येची माहिती दिली नाही. जगभरात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी औषध बनविण्यासाठी काम चालू आहे याबाबत त्यांनी म्हटले की, यामुळे प्री – क्लिनिकल स्टडीसाठी आवश्यक लस देण्याव्यतिरिक्त, औषधाच्या उत्पादनाला देखील गती येईल.’
BITS पिलानी आणि IISc- बंगळुरू चे माजी विद्यार्थी असलेले वासन यांनी स्कॉलरशिप मिळवल्यानंतर ऑक्सफर्ड च्या ट्रिनिटी कॉलेज मध्ये शिक्षण घेतले. तेथून डॉक्टरेट झाल्यानंतर त्यांनी डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका व्हायरस वर त्यांनी काम केले.