‘महामारी’चे आतापर्यंत 135 दिवस पूर्ण, निष्काळजीपणा झाल्यास परिस्थिती होऊ शकते अतिशय ‘गंभीर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अज्ञात अश्या प्राणघातक कोरोना विषाणू बाबत भारतीय शास्त्रज्ञ म्हणतात की, दुर्लक्ष झाले तर परिस्थिती आपत्तीजनक ठरू शकते. देशात या साथीच्या रोगास आतापर्यंत 135 दिवस पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम आणि डब्ल्यूएचओचे माजी महामारी रोग संचालक राजेश भाटिया यांनी सुरुवातीच्या 100 दिवसांचा आढावा घेतला. आयजेएमआरच्या कोविड -19 अंकात हे प्रकाशित होत आहे. एनआयव्हीत पहिल्या दिवसापासूनच साथीची तपासणी, कंटेन्ट योजना, औषधे आणि लसीची चाचणी सुरू आहे.

कोरोना विषाणूसंदर्भात असंख्य गणितात्मक मूल्यांकन समोर येत आहे. यासंदर्भात त्यांनी सल्ला दिला आहे की, साथीच्या लढाईत अशा मूल्यांकनावर विश्वास ठेवणे, हानिकारक असू शकते. त्याचप्रमाणे त्यांनी म्हंटले कि, लॉकडाऊन दरम्यान नोकरी व अन्नाअभावी मोठ्या संख्येने परप्रवासी कामगार स्थलांतरित झाले होते. याचा अंदाज पूर्वी नव्हता, ज्यामुळे रोगाचा विस्तार पाहायला मिळाला. म्हणूनच याचा सामना करण्यासाठी राज्यांना कंटेनमेंट प्लॅनिंग आणि पाळत ठेवण्याचा पर्याय आहे.

प्राण्यांवर देखील नजर ठेवणे आवश्यक
कोरोना विषाणूसह लाखो संसर्गजन्य रोग वन्य प्राण्यांद्वारे पसरतात. त्यापैकी बहुतेक प्राण्यांपासून मानवापर्यंत पोहोचत आहेत. अशा परिस्थितीत संयुक्त देखरेख करणे आवश्यक आहे. ज्याद्वारे मानव आणि प्राणी दोन्हींवर पाळत ठेवता येईल. जेणेकरुन संसर्गाची माहिती आधीच कळेल.

… तर साथीचा रोग पसरला नसता
एका मोठ्या लॉकडाऊननंतरही रुग्णांच्या संख्येत घट न होण्याबाबतीत त्यांनी म्हंटले कि, लॉकडाऊन 24 मार्चच्या रात्रीपासून लागू झाले. पण त्याचा परिणाम मे मध्ये दिसू लागला. जेव्हा 19 एप्रिल रोजी संसर्ग दर 3.4 वरून 7.5 टक्क्यांवर आणि त्यानंतर मेच्या दुसर्‍या आठवड्यात 12.9 टक्केपर्यंत पोहोचला. दरम्यान, दररोज देशाच्या विविध भागात पोहोचणे लॉकडाउनची अंमलबजावणी दर्शविते, दिलासादायक बाब हणजे देशात साथीची परिस्थिती एकसारखी नव्हती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like