Share Market : भारतीय शेयर बाजार ‘क्रॅश’ ! Sensex 1939 अंकांनी कोसळला, Nifty 14550 च्या खाली बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   भारतीय शेयर बाजार आज मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स सुमारे 2000 अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये सुद्धा 550 अंकापेक्षा जास्त घसरण झाली आहे. शेयर बाजारातील ही 2021 ची सर्वात मोठी घसरण आहे, यापूर्वी 22 फेब्रुवारीला सेन्सेक्स 50 हजारच्या खाली बंद झाला होता. मे 2020 च्यानंतर ही एका दिवसातील सेन्सेक्सची सर्वात मोठी घसरण आहे.

सेन्सेक्स 50,000 च्या खाली बंद

सेन्सेक्स आज 1939 अंकाने म्हणजे 3.8 टक्क्यांनी कोसळून 49,100 वर बंद झाला, 22 फेब्रुवारीच्या नंतरची ही सेन्सेक्मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे, 22 फेब्रुवारीला सेन्सेक्स 1145 अंकांनी कोसळला होता. निफ्टी सुद्धा 14550 च्या खाली बंद झाला आहे, निफ्टीत आज 3.76 टक्के म्हणजे 568 अंकांची घसरण दिसून आली. 18 मे 2020 च्या नंतरची ही निफ्टीमधील सर्वात मोठी घसरण आहे. निफ्टी बँक सुद्धा 18 मे 2020 च्यानंतरच्या सर्वात मोठ्या घसरणीला बळी पडला आहे. इंट्राडेमध्ये आज सेन्सेक्सने 49000 चा स्तर सुद्धा तोडला होता.

सर्वात जास्त फटका यांना…

या घसरणीचे सर्वात मोठे व्हिलन वित्तीय शेयर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC, HDFC Bank आणि ICICI Bank होते. सेन्सेक्सचे 30 पैकी 30 स्टॉक्स लाल निशाणासह बंद झाले आहेत. निफ्टीमध्ये सुद्धा चौफेर घसरणीमुळे सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल निशाणासह बंद झाले.

सेक्टोरल इंडेक्सची स्थिती

सेक्टोरल इंडेक्समध्ये सर्वात जास्त फटका बँक इंडेक्सला बसला, बँक इंडेक्स 4.78 टक्के कोसळला, निफ्टी ऑटो इंडेक्स 3.12 टक्के कोसळून बंद झाला. निफ्टीच्या 50 शेयर्सपैकी एकसुद्धा शेयर हिरव्या निशाणीवर बंद झाला नाही. निफ्टीचे 7 शेयर आज 6 टक्के जास्त कोसळून बंद झाले. तर 6 शेयरमध्ये 5 टक्केपेक्षा जास्तची घसरण नोंदली गेली. शेयर बाजारात आज जबरदस्त चढ-उतार होता, ज्यामुळे व्हॉलिटॅलिटी इंडेक्स VIX सुमारे 23 टक्के वाढून बंद झाला.

निफ्टीमध्ये सर्वात जास्त घसरलेले

ONGC, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रीड, JSW स्टील, हीरो मोटोकॉर्प, GAIL, बजाज फिनसर्व्ह, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, ग्रासिम

जगभरातील बाजार सुद्धा कोसळले

सीरियावर अमेरिकेच्या एयर स्ट्राइकमुळे भारतीय शेयर बाजारात ही घसरण आली आहे. जगातील अन्य देशांच्या शेयर बाजारात सुद्धा हाहाकार उडाला आहे. जपान, लंडन, जर्मनी आणि हाँग-काँगचे बाजार मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.