महिलांना ‘शस्त्र’ बाळगण्याची ‘परवानगी’ द्या, ‘शूटर’ हिनाचं HM अमित शहांना ‘साकडं’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – नेमबाज हिना सिद्धू हिने देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्या अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिच्या हत्येची घटनेने देशात संतापाचे वातावरण आहे. देशाच्या विविध भागातून तीव्र पडसाद उमटत आहेत. यातील एक तीव्र प्रतिक्रिया प्रसिद्ध नेमाबज हिना सिद्धू हिने मांडली.

देशात होत असलेल्या महिल्या अत्याचारावर हिनाने सोशल मिडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.शस्त्रास्त कायद्यात सुधारणा करण्याऐवजी देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्यावा अशी मागणी हिनाने आपल्या ट्विटमध्ये केली.


लोकांनी परवाना असलेली शस्त्र बाळगणं ही समस्या नसून आम्हाला सुरक्षित प्रवास करता आला पाहिजे, सुरक्षितपणे कामाला जाता आले पाहिजे, कामावरुन घरी येता आले पाहिजे. आम्हाला आमचे संरक्षम स्वत: करता यायला हवे. कारण पोलीस आणि संरक्षक दले हे आमच्यासाठी नाहीत. जेव्हा एखादी झुंड एखाद्या महिलेविरुद्ध असते तेव्हा तिच्यासाठी त्यावेळी शस्त्र हाच एकमेव पर्याय असतो असे हिनाने ट्विटमध्ये म्हणले.


हैदराबादमध्ये एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करुन जाळून हत्या करण्यात आली. ही घटना समोर आल्यावर संपूर्ण देशात खळबळ उडाली. हैदराबाद – बेंगळुरु महामार्गावर शाहनगर येथे एका पुलाखाली पोलिसांनी या महिलेचा मृतदेह मिळाला. रात्री घरी जाताना दुचाकी पंक्चर झाली, त्या एकट्या असल्याचे पाहून आरोपींनी हे कृत्य केले.

बिहारमध्ये झाला अत्याचार –
हैदराबाद येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेदरम्यान बिहारमधील बक्सर येथे अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना 3 डिसेंबरला उघडकीस आली. बक्सरमध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार करु तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले. या घटनेने संपूर्ण बिहार हादरले.

Visit : policenama.com