‘चायनीज’ TikTok ला वाईट दिवस ?, भारताचं Mitron अ‍ॅप देतय ‘टक्कर’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चिनी अ‍ॅप टिकटॉक वेळोवेळी चर्चेत असते. अलीकडे पुन्हा अ‍ॅसिड हल्लासारख्या विषयामुळे या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या दरम्यान, टिकटॉकसारखेच एक भारतीय अ‍ॅप Mitron आले आहे. अल्पावधीतच Mitron अ‍ॅपची लोकप्रियता वाढली आणि सध्या प्ले स्टोअरनुसार ते भारतातील लोकप्रिय अ‍ॅप्सपैकी एक बनले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे एका महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आले होते.

एका महिन्यापूर्वी लाँच केलेल्या या अ‍ॅपला आतापर्यंत 50 लाख वेळा डाउनलोड केले गेले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जर आपण त्याचे डाउनलोड पाहिले तर, आत्ताच ते चिनी अ‍ॅप टिकटॉकशी स्पर्धा करत असल्याचे दिसते आहे.

टिकटॉक आहे धोक्यात, हे आहे कारण

Mitron अ‍ॅप अशा वेळी आले आहे जेव्हा टिकटॉक अ‍ॅपला लोक सतत विरोध दर्शवत आहेत. परिस्थिती अशी आहे की या अ‍ॅपचे रेटिंग 1.5 पर्यंत पोहोचले आहे. यामागील दोन कारणे आहेत, यातील पहिले कारण म्हणजे युट्युबर कॅरी मिनाटीने टिकटॉकबद्दल बनविलेला रोस्ट व्हिडिओ हे आहे. कॅरी मिनाटी नावाच्या एका भारतीय युट्यूबने एक टिकटॉक वापरकर्त्याला त्याच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये उलट सुलट बोलला होता, त्यानंतर यूट्यूबने कॅरीचा व्हिडिओ डिलीट केला होता.

कॅरी मिनाटी (वास्तविक नाव अजय) चे यूट्यूब सब्सक्रायबर आणि चाहते कोट्यावधीच्या संख्येत आहेत, त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी टिकटॉकचे रेटिंग कमी करण्यास सुरवात केली. इतकेच नव्हे तर टिकटॉकच्या जुन्या आणि अ‍ॅसिड हल्ल्याशी संबंधित कॉन्टेंट व्हायरल करण्यात आली आणि हे प्रकरण महिला आयोगापर्यंत पोहोचले.

Mitron अ‍ॅपला दोन प्रकारे फायदा होईल

टिकटॉक हे एक चिनी अ‍ॅप आहे आणि अलीकडेच पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की लोकलसाठी व्होकल झाले पाहिजे. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबद्दल चीनविरूद्ध काही लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत टिकटॉक सारखे भारतीय अ‍ॅप लाँच झाले आहे, त्यामुळे साहजिकच लोक त्याला पसंती जरूर देतील.

तथापि, हे अ‍ॅप टिकटॉकला मागे टाकेल की नाही हे सांगणे तसे अवघड आहे. कारण टिकटॉक हे भारत सोडून इतर अनेक देशांमध्ये देखील लोकप्रिय आहे आणि त्यामागे बाइट डान्स नावाची एक मोठी कंपनी आहे. ताज्या अहवालानुसार, Mitron सध्या गुगल प्ले स्टोअरच्या फ्री अ‍ॅप्स चार्टमध्ये 11 व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये आरोग्य सेतु अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर आहे तर टिकटॉक दुसर्‍या आणि व्हॉट्सअ‍ॅप तिसर्‍या क्रमांकावर आहे.

Mitron अ‍ॅप काम कसे करते?

हे अ‍ॅप देखील टिकटॉकच्या धर्तीवरच तयार करण्यात आले आहे. हे अ‍ॅप स्वत:ला एक लहान व्हिडिओ आणि सामाजिक व्यासपीठ म्हणून वर्णन करते. असा दावा केला गेला आहे की लोकांना त्यांची नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोद दर्शविण्यासाठी तयार केले गेले आहे. टिकटॉक प्रमाणेच इथे व्हिडिओ बनविले जाऊ शकतात, एडिट केले जाऊ शकतात आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील सामायिक केले जाऊ शकतात. हे अ‍ॅप 7.9MB चे आहे.